कानपूर अपघातात नवा ट्विस्ट! "ड्रायव्हर गाडी चालवत होता, मालक नाही"; शिवमला वाचवण्यासाठी वकिलाचा डाव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 20:03 IST2026-02-09T20:03:16+5:302026-02-09T20:03:53+5:30

शिवम मिश्रा याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता त्याच्या वकिलाने शुभम गाडी चालवतच नव्हता, असा खळबळजनक दावा केला आहे.

New twist in Kanpur accident! "The driver was driving, not the owner"; Lawyer's ploy to save Shivam? | कानपूर अपघातात नवा ट्विस्ट! "ड्रायव्हर गाडी चालवत होता, मालक नाही"; शिवमला वाचवण्यासाठी वकिलाचा डाव?

कानपूर अपघातात नवा ट्विस्ट! "ड्रायव्हर गाडी चालवत होता, मालक नाही"; शिवमला वाचवण्यासाठी वकिलाचा डाव?

कानपूरच्या व्हीआयपी रोडवर झालेल्या भीषण कार अपघाताला आता एक नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. तंबाखू सम्राट के.के. मिश्रा यांचा मुलगा शिवम मिश्रा याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता त्याच्या वकिलाने शुभम गाडी चालवतच नव्हता, असा खळबळजनक दावा केला आहे. दुसरीकडे, या प्रकरणात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत पोलीस आयुक्तांनी ग्वालटोली पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना तडकाफडकी लाईन हाजिर केले आहे.

वकिलाचा 'तो' दावा अन् पोलिसांची कोंडी

रविवारी झालेल्या अपघातानंतर सर्वत्र शिवम मिश्राचे नाव चर्चेत होते. मात्र, शिवमच्या घरून बाहेर पडताना त्याचे वकील धनंजय कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना संपूर्ण कहाणीच पलटवून लावली. "अपघाताच्या वेळी शिवम मिश्रा गाडी चालवत नव्हता, तर त्यांचा ड्रायव्हर मोहन गाडी चालवत होता. शिवम गाडीत नव्हताच, त्यामुळे त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल होऊ शकत नाही," असा दावा वकिलांनी केला आहे. जेव्हा वकिलांना विचारण्यात आले की, 'जर शिवम निर्दोष असेल तर तो समोर का येत नाहीये?' तेव्हा मात्र वकिलांनी मौन बाळगणे पसंत केले.

तपासासाठी गेलेल्या पोलिसांना दारातच रोखले!

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गेलेल्या तपास अधिकाऱ्याला के.के. मिश्रा यांच्या आलिशान बंगल्यात प्रवेशही नाकारण्यात आला. बराच वेळ गेट वाजवूनही आतून कोणीही प्रतिसाद दिला नाही. विशेष म्हणजे, पोलिसांसाठी बंद असलेले गेट आरोपी शिवमच्या वकिलांसाठी मात्र तात्काळ उघडले गेले. तासाभराच्या गुप्त बैठकीनंतर वकिलांनी बाहेर येऊन ड्रायव्हरचा नवा अँगल समोर आणला, ज्यामुळे या प्रकरणाचा गुंता वाढला आहे.

पोलीस आयुक्तांचा दणका

सुरुवातीला या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल केल्यामुळे कानपूर पोलिसांवर टीका होत होती. पैसेवाल्यांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप झाला. यावर पोलीस आयुक्त रघुवीर लाल यांनी कडक भूमिका घेतली आहे. त्यांनी ग्वालटोली पोलीस ठाण्याच्या एसएचओला लाईन हाजिर करण्याचे आदेश दिले. "गुन्हेगार कोणताही असो, मग तो कार चालवणारा असो वा इतर कोणी, कोणाचीही गय केली जाणार नाही," असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

व्हायरल व्हिडिओने वाढवल्या अडचणी

अपघाताचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये गाडी कोण चालवत होते, याचे काही पुरावे समोर आल्याची चर्चा आहे. या व्हिडिओंच्या आधारेच पोलिसांनी सुरुवातीला अज्ञात असलेल्या तक्रारीत आता शिवम मिश्राचे नाव समाविष्ट केले आहे. जखमी तौफीक याने दिलेल्या तक्रारीनुसार, सुसाट गाडीने त्याला उडवले होते, ज्यामध्ये त्याच्या हात-पायांना गंभीर दुखापत झाली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी न्यायालयात होणार असून, पोलीस 'तो' रईसजादा आणि 'त्या' ड्रायव्हरचे गूढ कसे उकलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title : कानपुर दुर्घटना: मालिक नहीं, ड्राइवर चला रहा था गाड़ी? वकील का दावा?

Web Summary : कानपुर कार दुर्घटना में नया मोड़। वकील का दावा है कि के.के. मिश्रा के बेटे नहीं, ड्राइवर गाड़ी चला रहा था। पुलिस जांच कर रही है, विरोध का सामना कर रही है। आयुक्त ने प्रारंभिक आलोचना के बाद सख्त कार्रवाई का आदेश दिया। वायरल वीडियो ने मामले को उलझा दिया; अदालत में सुनवाई निर्धारित।

Web Title : Kanpur Accident: Driver, Not Owner, Was Driving? Lawyer's Twist?

Web Summary : Kanpur car accident takes a turn. Lawyer claims the driver, not K.K. Mishra's son, was driving. Police investigate, facing resistance. Commissioner orders strict action after initial criticism. Viral videos complicate case; court hearing scheduled.