शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

थायलंडहून मौजमजेसाठी बोलवलेल्या कॉलगर्ल प्रकरणात नवा ट्विस्ट; पोलिसांच्या हाती मोठे धागेदोरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 10:49 IST

सध्या या प्रकरणाचा तपास लखनौ पोलीस करत आहेत.

नवी दिल्ली: देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. यादरम्यान, एका महिलेच्या कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची एक धक्कादायक घटना समोर आली होती. 

थायलंडहून आलेल्या एका महिलेचा लखनौमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला होता. पोलिसांनी या महिलेवर अंत्यसंस्कार केले. मात्र प्राथमिक तपासामध्ये ही महिला कॉलगर्ल होती आणि तिला एका व्यावसायिकाने मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून भारतात बोलावले होते, अशी माहिती समोर आली होती. दरम्यान या प्रकरणी काही नवीन धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. याप्रकणी काही बड्या नेत्यांवर आरोप केले जात असून पोलीस आतापर्यत 50 मोबाइल क्रमांकांची तपासणी करत आहेत.

10 दिवसांपूर्वी मृत युवतीला 7 लाख रुपये देऊन थायलँडवरून बोलवलं होतं. आता समाजवादी पक्षाच्या प्रवक्त्यांनी भाजपाचे राज्यसभा खासदार संजय सेठच्या मुलाने या युवतीला मौजमज्जा करण्यासाठी बोलवल्याचा आरोप  समाजवादी पार्टीचे प्रवक्ते आयपी सिंह यांनी  केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास लखनौ पोलीस करत आहेत.

दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार ही कॉल गर्ल गेले तीन वर्षापासून लखनऊमध्ये येत होती असून ती शहरातील मोठ्या स्पा सेंटरमध्ये काम करायची. अनेक बडे नेते आणि व्यावसायिका तिच्या स्पा सेंटरमध्ये मसाजसाठी येत होते. त्यामुळे या प्रकरणी आणखी काही हायप्रोफाइल नावं समोर येण्याची शक्यता आहे. 3 मे रोजी या महिलेची तब्येत बिघडल्याने तिचा मृत्यू झाला होता, त्यामुळे प्रकरण आणखी चिघळलं आहे. 

काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी लखनौमध्ये एका व्यापाऱ्याने 7 लाख खर्च करून थायलँडवरून कॉलगर्ल बोलवल्याची बातमी समोर आली होती. 10 दिवसांपूर्वी या कॉलगर्लला लखनौला बोलावलं. त्यानंतर 2 दिवसांत ती कोरोना संक्रमणामुळे आजारी पडली. याची माहिती व्यावसायिकाने थायलँड एम्बेसीला दिली. त्यानंतर एम्बेसीच्या हस्तक्षेपानंतर कॉल गर्लला राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु 3 मे रोजी तिचा मृत्यू झाला होता.

थायलंडच्या दुतावासाने या महिलेच्या मृत्यू प्रमाणपत्राची मागणीही लखनौच्या प्रशासनाकडे केली आहे. लखनौच्या पोलिसांनी महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले आणि दुतावासाला माहिती दिली, असे विभूती खंड पोलीस ठाण्याचे प्रभारी चंद्र शेखर सिंह यांनी सांगितले. मात्र पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीमध्ये ही महिला कॉल गर्ल असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच यासर्वामागे इंटरनॅशनल सेक्स रॅकेट असण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याला कुणीही अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही. 

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस