देशात संरक्षण उत्पादनाचा नवा विक्रम !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 09:22 IST2025-08-10T09:21:46+5:302025-08-10T09:22:15+5:30

देशाचे संरक्षण उत्पादन प्रथमच दीड लाख कोटींवर

New record of defense production in the country production crosses 1.5 lakh crores for the first time | देशात संरक्षण उत्पादनाचा नवा विक्रम !

देशात संरक्षण उत्पादनाचा नवा विक्रम !

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने संरक्षण उत्पादनात एक नवा अध्याय लिहिला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२४-२५ या आर्थिक वर्षात देशाचे संरक्षण उत्पादन १,५०,५९० कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

ही वाढ केवळ आकड्यांपुरती मर्यादित नसून, देशाच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत (१.२७ लाख कोटी) ही वाढ तब्बल १८ टक्के आहे. २०१९-२० पासून तर यात ९० टक्क्यांची प्रचंड वाढ झाली आहे, तेव्हा हा आकडा ७९,०७१ कोटी रुपये होता.

या वाढीव उत्पादनातून भारताचा संरक्षण क्षेत्रातील औद्योगिक पाया अधिक मजबूत होत असल्याचे सिंह यांनी म्हटले आहे. भारताने पहिल्यांदाच संरक्षण उत्पादनात दीड लाख कोटींचा टप्पा पार केला असून हे देशाच्या वाढत्या सामर्थ्याचे प्रतीक आहे.  गेल्या वर्षीच्या तुलनेत १८ टक्के आणि २०१९-२० च्या तुलनेत ९० टक्क्यांची वाढ ही आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला बळ देणारी आहे.

भारताचे संरक्षण उत्पादन

२०२४-२५
एकूण उत्पादन : १,५०,५९० कोटी रु. वाढ (मागील वर्षाच्या तुलनेत): १८% 
२०२३-२४
एकूण उत्पादन : १,२७,००० कोटी रु. वाढ (मागील वर्षाच्या तुलनेत): जवळपास ३०% 
२०१९-२०
एकूण उत्पादन :  ७९,०७१ कोटी रु.एकूण वाढ : २०१९-२० पासून आतापर्यंत: ९०%

Web Title: New record of defense production in the country production crosses 1.5 lakh crores for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.