शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

ससंदेच्या कँटीनचा नवा मेन्यू; १०० रूपयांत शाकाहारी थाळी तर ७०० रूपयांत नॉनव्हेज बुफे

By जयदीप दाभोळकर | Published: January 27, 2021 1:20 PM

संसदेतील कँटीमनध्ये मिळणाऱ्या पदार्थांवरील अनुदान बंद करण्याचा घेण्यात आला होता निर्णय

ठळक मुद्देसंसदेतील कँटीमनध्ये मिळणाऱ्या पदार्थांवरील अनुदान बंद करण्याचा घेण्यात आला होता निर्णयदरवर्षी मिळत होतं १७ कोटी रूपयांचं अनुदान

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २९ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. यापूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मोठा निर्णय घेत ससंदेतील कँटीनमध्ये मिळणाऱ्या जेवणावरील अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता संसदेतील जेवणाचं नवं रेट कार्ट जारी करण्यात आलं. आता संसदेच्या कँटिनमध्ये १०० रूपयांना शाकाहारी थाळी आणि ७०० रूपयांना मांसाहारी बुफे मिळणार आहे. यापूर्वी अनेकदा संसदेतील कँटीनमध्ये मिळणाऱ्या अन्नपदार्थांवरील अनुदान बंद करण्याची मागणी करण्यात आली होती. संसदेत कँटीनमध्ये आता सर्वात स्वस्त एकच पदार्थ राहिला असून तो म्हणजे चपाती. कँटीनमध्ये चपातीची किंमत ३ रूपये ठेवण्यात आली आहे. तर मांसाहारी बुफे लंचसाठी आता ७०० रूपये, चिकन बिर्याणीसाठई १०० रूपये, चिकन करी, ७५ रूपये, साधा डोसा ३० रूपये आणि मटण बिर्याणीसाठई १५० रूपये खर्च करावे लागणार आहेत. यापूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला .यांनी संसदेच्या कँटीनमध्ये अन्नपदार्थांवर देण्यात येणारं अनुदान बंद करण्याची निर्णय घेतला होता. लोकसभेच्या बिझनेस अॅडव्हाझरी समितीमधील सर्वपक्षीय सदस्यांनी एकमतानं हे अनुदान रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. आता या कँटीनमध्ये मिळणारे पदार्थ ठरवण्यात आलेल्या दरांवरच मिळणार आहेत. 

१७ कोटींचं अनुदान
दरवर्षी संसदेच्या कँटीनला वर्षाला १७ कोटी रूपयांचं अनुदान दिलं जात होतं. २०१७-१८ मध्ये माहिती अधिकारांतर्गत मागणवण्यात आलेल्या माहितीतून संसदेच्या कँटीनमध्ये चिकन करी ५० रूपयांमध्ये तर शाकाहारी थाळी ३५ रूपयांमध्ये मिळत असल्याची माहिती समोर आली होती. तर दुसरीकडे थ्री कोर्स लंचचे दर १०६ रूपये तर डोसा केवळ १२ रूपयांमध्ये मिळत असल्याचं समोर आलं होतं.२९ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या संसदेचा कामकाजादरम्यान राज्यसभेचं कामकाज सकाळी ९ ते दुपारी २ आणि लोकसभेचं कामकाज संध्याकाळी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत होणार आहे. तसंच यापूर्वी घेण्यात आलेल्या निर्णयानुसार यादरम्यान १ तासाचा प्रश्नोत्तरांचा तासही ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :ParliamentसंसदIndiaभारतfoodअन्नMember of parliamentखासदारom birlaओम बिर्लाRajya Sabhaराज्यसभाlok sabhaलोकसभा