शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

CoronaVirus News: कोरोनाची ३ नवी लक्षणं आढळली; 'हा' त्रास झाल्यास असू शकतो धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2020 11:52 AM

कोरोनाची तीन नवी लक्षणं आढळली

मुंबई: जगातील कोरोनाबाधितांची संख्या १ कोटीच्या पुढे गेली असून मृतांचा आकडा ५ लाखांहून जास्त आहे. दिवसागणिक कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यातच आता कोरोनाची आणखी तीन लक्षणं आढळून आली आहेत. कोरोनाची बाधा झाल्यास सर्दी, उलट्या, अतिसाराचा त्रास होतो. मात्र यात आणखी तीन लक्षणांची भर पडली आहे. कंबरदुखीदेखील कोरोनाचं लक्षण असल्याची माहिती आता समोर आली आहे. याशिवाय पोटदुखी, पोटऱ्यांमधील वेदना हीदेखील कोरोनाची लक्षणं असू शकतात, अशी माहिती मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर जलील पारकर यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून पारकर कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांवर उपचार करत आहेत. त्यांनी जवळपास २०० रुग्णांवर उपचार केले. त्यानंतर त्यांनाही कोरोनाची लागण झाली. कोरोना रुग्णांवर उपचार करताना बऱ्याचशा प्रकरणांमध्ये पाठदुखीचा त्रास होत असल्याची तक्रार रुग्णांनी केल्याचं पारकर यांनी सांगितलं.आतापर्यंत कोरोनाची ९ लक्षणं आढळून आली आहेत. त्यात आता अमेरिकन सेंटर फॉर डिजीज कंट्रोलनं तीन नव्या लक्षणांचा समावेश केला आहे. त्यात नाक गळणं, पोटात ढवळणं, उलट्या यांचा समावेश आहे. याआधी कोरोनाची ९ लक्षणं आढळून आली आहेत. त्यात ताप, सुका खोकला, श्वासोच्छवासात अडचणी, थकवा, अंगदुखी, डोकेदुखी, तोंडाची चव जाणं, घशात खवखव यांचा समावेश आहे.मधुमेह, रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तींना कोरोनाचा अधिक धोका असल्याची माहिती आधीच समोर आली आहे. मात्र आता अनेकांच्या शरीरातील साखरेचं प्रमाण अचानक वाढू लागल्याचं डॉक्टरांच्या निदर्शनास येऊ लागलं आहे. आतापर्यंत कधीही मधुमेहाचा त्रास न झालेल्या अनेक व्यक्तींच्या शरीरातील साखरेचं प्रमाण ४०० च्या पुढे गेलं आहे. कोरोनाची लागण झालेल्या अनेकांच्या शरीरातील साखरेचं प्रमाण वाढल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.पावसाळ्यात विषाणूंच्या संक्रमणापासून बचावासाठी आयुष मंत्रालयाने सांगितले 'हे' सोपे उपायसंतापजनक! मास्क लावण्याचा सल्ला दिला म्हणून कार्यालयातील दिव्यांग महिलेला बेदम मारहाण

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या