शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

भारत-श्रीलंका यांच्यात नागरी अणुकरार सहकार्याचे नवे पर्व: संयुक्त पत्रपरिषदेत घोषणा

By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST

नवी दिल्ली : भारत- श्रीलंकेने सोमवारी नागरी अणुकरारावर स्वाक्षरी करण्यासह संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या विस्ताराचा निर्णय घेत द्विपक्षीय संबंध नव्या उंचीवर नेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाला सिरीसेना यांनी चर्चेनंतर संयुक्त पत्रपरिषदेत याबाबत घोषणा केली.

नवी दिल्ली : भारत- श्रीलंकेने सोमवारी नागरी अणुकरारावर स्वाक्षरी करण्यासह संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या विस्ताराचा निर्णय घेत द्विपक्षीय संबंध नव्या उंचीवर नेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाला सिरीसेना यांनी चर्चेनंतर संयुक्त पत्रपरिषदेत याबाबत घोषणा केली.
विधायक आणि मानवतावादी दृष्टिकोन अवलंबत मच्छिमारांच्या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांनी कटिबद्धता दर्शविली आहे. श्रीलंकेने प्रथमच अशा करारावर स्वाक्षरी केली आहे. कृषी आणि आरोग्यनिगेसारख्या अन्य क्षेत्रांमध्येही सहकार्याची दारे उघडली जातील, अशी आशा मोदींनी व्यक्त केली. श्रीलंकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत महिंदा राजपक्षे यांचा पराभव करीत त्यांची १० वर्षांची राजवट उलथवणारे सिरीसेना अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पहिलाच विदेशदौरा करताना रविवारी भारतभेटीवर आले.
------------------
काय असेल करारात...
अणुकरारामुळे दोन्ही देशांना ज्ञान आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याचे आदान-प्रदान करता येईल.
संसाधनांच्या वाटाघाटीसह अणुऊर्जेचा शांततेसाठी वापर करण्याकरिता कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासह क्षमता वाढविण्यालाही हा करार लाभदायक ठरेल. रेडिओस्टोप्सचा वापर, अणुसुरक्षा, किरणोर्त्सग संरक्षण, रेडिओधर्मी टाकाऊ पदार्थांचे व्यवस्थापन, अणू आणि रेडिओधर्मी पदार्थांचा अपघात टाळणे तसेच पर्यावरण संरक्षणासारख्या क्षेत्रातही दोन देशांचे सहकार्याचे नवे पर्व सुरू करतील.
-------------------------
अन्य तीन करारांवर स्वाक्षऱ्या...
कृषी, नालंदा विद्यापीठ प्रकल्पात श्रीलंकेचा सहभाग, तसेच संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य या तीन करारांवरही दोन देशांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या क्षेत्रात संबंध आणखी विस्तारण्यावर दोन्ही देश सहमत झाले असल्याचे मोदींनी स्पष्ट केले. सागरी सुरक्षा सहकार्यातील प्रगतीचे आम्ही स्वागत करतो आहोत. मालदीवच्या सहभागामुळे सहकार्य त्रिस्तरीय असेल. मच्छिमारांच्या मुद्याला सिरीसेना यांनी सवार्ेच्च प्राधान्य दिले आहे कारण दोन्ही देशांच्या मच्छिमार बांधवांच्या जीवनमानाचा प्रश्न आहे. त्याबाबत मानवतावादी दृष्टिकोन अवलंबला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
---------------------
कोट
दोन देशांची मैत्री केवळ परस्परांनाच नव्हे तर उपखंडासाठी महत्त्वपूर्ण आहे. मोदींनी संबंध सुधारण्यासाठी चालविलेल्या प्रयत्नांचे मी स्वागत करतो. दोन देशांचे संबंध आणखी बळकट होतील.
- मैत्रीपाला सिरीसेना
श्रीलंकेचे अध्यक्ष
--------------------
सिरीसेना यांनी श्रीलंकाभेटीचे निमंत्रण दिल्याबद्दल मी आभार मानतो. मार्चमध्ये या देशाला भेट देण्यासाठी मी उत्सुक आहे. द्विपक्षीय संबंध नव्या उंचीवर नेण्याची आम्हाला अभूतपूर्व अशी संधी मिळाली आहे. सिरीसेना यांच्या भारतभेटीमुळे आम्ही त्या दिशेने ठोस सुरुवात करू
-नरेंद्र मोदी