शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

बॉम्बची खोटी माहिती दिल्यास १ कोटी रुपयांपर्यंतचा दंड, विमान कंपन्यांना मिळणाऱ्या धमक्यांनंतर केंद्राचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 13:53 IST

New Aviation Rules: या धमक्यांमुळे विमान कंपन्यांचे आर्थिक नुकसान झाले. सोबतच प्रवाशांनाही मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत विमान कंपन्यांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्याच्या घटना घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर अशा खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकार तयारी करत आहे. त्यानुसार, ९ डिसेंबरनंतर कोणत्याही विमान कंपनीत बॉम्बची खोटी माहिती देणाऱ्याला १ कोटी रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो.

२०२४ या एका वर्षात १ हजाराहून अधिक वेळा खोट्या धमक्या दिल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. या धमक्यांमुळे विमान कंपन्यांचे आर्थिक नुकसान झाले. सोबतच प्रवाशांनाही मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. या सर्व बाबी लक्षात घेऊन सरकारने मोठा दंड आकारण्याची तयारी केली आहे.

बॉम्बच्या खोट्या धमक्या दिल्याप्रकरणी दोषी आढळल्यास, अनेक गंभीर गुन्हेगारी आरोपांसह १ लाख रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. तसेच, अशा कारवायांमध्ये सहभागी असलेल्या संघटनांवर शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे. छोट्या संघटनांना  ५० लाख रुपये, मध्यम संघटनांना ७५ लाख रुपये, तर मोठ्या संघटनांना १ कोटी रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.

केंद्र सरकारने सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी ब्युरोला अधिकार दिले आहेत की, सुरक्षेचे धोके लक्षात घेऊन ते कोणत्याही प्रवाशाला विमानात प्रवेश करण्यापासून रोखू शकतात. यासोबतच, एखादा प्रवासी चुकीची माहिती देऊन विमानात बसलेल्या लोकांना समस्या निर्माण करतो आणि लोकांमध्ये दहशत निर्माण करतो किंवा पायलटला त्रास देतो. अशा स्थितीत त्या प्रवाशावर कारवाई होऊ शकते.

सरकारकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत एकूण ९९४ घटनांची नोंद झाली आहे. तर ऑगस्ट २०२२ पासून आतापर्यंत धमक्यांचे एकूण ११४३ गुन्हे दाखल झाले आहेत. आकडेवारी पाहिली तर त्यामध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. ही आकडेवारी वाढण्यामागचे कारण म्हणजे सोशल मीडियावरून दिला जाणाऱ्या धमक्या आहेत. ज्या नंतर डिलिट केल्या जातात.

टॅग्स :airplaneविमानCrime Newsगुन्हेगारी