शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
3
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
4
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
5
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
6
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
7
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
8
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
9
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
10
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
11
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्र कुमार बोस यांचा भाजपमधून राजीनामा; 'हे' कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2023 6:14 PM

Chandra Kumar Bose Resigns: 'मी जो विचार घेऊन भाजपमध्ये आलो, तो कधीच पूर्ण झाले नाही.'

Chandra Bose Resigns from BJP: भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाची भूमिका बजावणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्र कुमार बोस (Chandra Kumar Bose) यांनी भाजपमधून (BJP) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. माझ्या शुभेच्छा पक्षासोबत आहेत, मात्र पक्षाने सर्व समाजाला एकत्र केले पाहिजे, असे त्यांनी पक्ष सोडताना म्हटले.

चंद्र कुमार बोस हे 2016 मध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपचे उपाध्यक्ष होते, पण त्यांना 2020 मध्ये पदावरुन हटवण्यात आले. चंद्र कुमार बोस यांनी राजीनामा देताना सांगितले की, मी 2016 मध्ये भाजपसाठी काम केले. मला पंतप्रधान मोदींचे काम मला आवडले होते. पण, भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर वाटले की, पक्षात ज्यापद्धतीचे राजकारण सुरू आहे, ते माझ्या आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आदर्शाप्रमाणे नाही. नेताजी जातीयवादी आणि फुटीरतावादी राजकारणाविरुद्ध लढले.

त्यांनी पुढे लिहिले, सुभाषचंद्र बोस आणि सरतचंद्र बोस यांच्या विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी मला केंद्रातून किंवा राज्य पातळीवरुन कोणताही पाठिंबा मिळाला नाही. मी बंगालमधील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पत्र लिहून रणनीती सुचवली होती. पण माझ्या प्रस्तावांकडे दुर्लक्ष करण्यात आले. माझ्या प्रस्तावाचे पालन होत नसेल, तर पक्षासोबत राहून काही उपयोग नाही. या दुर्दैवी परिस्थितीमुळे मला भाजपचा सदस्य म्हणून राहणे अशक्य झाले आहे. 

भाजपमध्ये येण्याचा उद्देश काय होता?पीटीआयशी बोलताना चंद्र कुमार बोस म्हणाले की, भाजपमध्ये येण्याचा माझा उद्देश शरतचंद्र बोस आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची धर्मनिरपेक्ष विचारधारा देशासमोर मांडणे हा आहे. आझाद हिंद मोर्चा काढावा, असे मी स्पष्टपणे सांगितले होते. या आघाडीचे नेतृत्व माझ्याकडे द्यायला हवे होते, पण ती कधीच स्थापन झाली नाही.

 

टॅग्स :BJPभाजपाwest bengalपश्चिम बंगालNetaji Subhashchandra Boseनेताजी सुभाषचंद्र बोसAmit Shahअमित शाहJ P Naddaजगत प्रकाश नड्डा