शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

नेस वाडिया यांच्या पत्रात ९ साक्षीदारांची नावे

By admin | Updated: July 3, 2014 04:13 IST

अभिनेत्री प्रीती झींटा विनयभंगप्रकरणी उद्योगपती नेस वाडीया यांनी मरिन ड्राइव्ह पोलिसांना पत्र धाडून नऊ साक्षीदारांची नावे सादर केली आहेत.

मुंबई : अभिनेत्री प्रीती झींटा विनयभंगप्रकरणी उद्योगपती नेस वाडीया यांनी मरिन ड्राइव्ह पोलिसांना पत्र धाडून नऊ साक्षीदारांची नावे सादर केली आहेत. प्रीतीने केलेली तक्रार खोटी असून पत्रात नमूद साक्षीदार ३० मे रोजी वानखेडे स्टेडीयमवर घडलेला नेमका घटनाक्रम ते तटस्थपणे सांगू शकतात. प्रीतीने तक्रार दिल्यानंतर नेस-पोलीस यांच्यातील हा पहिलाच अधिकृत संवाद आहे.नेस यांनी हे पत्र तपास अधिकाऱ्याच्या नावे लिहिलेले असून आज दुपारी आपल्या प्रतिनिधीमार्फत मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात पोहोचवले. या पत्रात सारिका लाल, लॉरेटा जोसेफ, पुजा दादलानी, अ‍ॅनलीन अ‍ॅडम्स, फराह ओमरभाई, स्वीटी बर्मन, कमलेश शहा, रायन मुस्तफा आणि शरत नाथ यांचा उल्लेख आहे. या सर्वांचे जबाब नोंदविणार का असे विचारले असता पोलीस उपायुक्त रविंद्र शिसवे यांनी सांगितले की गरज पडल्यास नेस यांनी दिलेल्या साक्षीदारांचे जबाब नोंदविले जातील.आयपीएल हा सुरूवातीपासून माझा प्रॉजेक्ट होता. आयपीएल स्पर्धेसाठी खेळाडूंच्या लिलावात मी पाच कोटी रूपये खर्च केले. पाच कोटी इतकी मोठी रक्कम मी फक्त माझ्यासाठीच नव्हते तर नेस यांच्यासाठीही खर्च केली होती. याचे पुरावे बीसीसीआयकडून मिळू शकतील. पुढे दोन महिन्यांनी नेस यांनी मला मुददलच परत केली. तेव्हा या तक्रारीमागे माझे आर्थिक गणित आहे, हा आरोप इथेच थांबायला हवा, असेही प्रीतीने म्हंटले आहे.मला प्रसिद्धी नको, सवंग प्रसिद्धी नकोच नको. आयुष्यात भूतकाळापेक्षा भविष्यकाळ महत्वाचा असतो, हे माझे तत्व आहे. आयुष्य भविष्याच्या दिशेने पुढे सरकते, मीही भूतकाळ मागे सोडून भविष्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे, अशी भावनाही प्रीतीने व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)