शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नेस वाडियांना लवकरच अटक?

By admin | Updated: June 15, 2014 03:19 IST

द्योगपती नेस वाडिया यांना येत्या आठवड्यात अटक केली जाण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शनिवारी व्यक्त केली.

मुंबई : सिनेअभिनेत्री व ‘आयपीएल’ क्रिकेट स्पर्धेतील किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाची सहमालक प्रीती झिंटा हिला धमकावणे, छळ करणे व तिचा पाणउतारा करणे इत्यादी गुन्ह्यांसाठी तिचा माजी ‘बॉय फ्रेण्ड’ व उद्योगपती नेस वाडिया यांना येत्या आठवड्यात अटक केली जाण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शनिवारी व्यक्त केली. नेस वाडिया यांच्याविरुद्ध मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्याने गुन्हा नोंदविला आहे. गेल्या ३० मे रोजी वानखेडे स्टेडियममध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब व चेन्नई सुपर किंग्ज या संघांदरम्यान आयपीएलचा सामना सुरू असताना वाडिया यांनी जे वर्तन केले, त्यासंदर्भात प्रीती झिंटाने ही फिर्याद केली आहे. याबाबत, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, तपासासाठी दोन स्वतंत्र तुकड्या तयार केल्या गेल्या आहेत. एक तुकडी त्या दिवशीच्या वानखेडे स्टेडियममधील सीसीटीव्ही फुटेजची छाननी करीत आहे, तर दुसरी साक्षीदारांचे जबाब नोंदवत आहे. यातून झिंटा हिच्या फिर्यादीस पुष्टी मिळाली की, आरोपी वाडिया यांचाही जबाब घेतला जाईल व त्यानंतरच त्यांना अटक केली जाऊ शकेल. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या खेळाडूंचे जबाब घेतले जाणार नाहीत, कारण कथित घटना घडली तेव्हा ते खेळाडूंसाठी असलेल्या वेगळ्या जागेत बसलेले होते, असे मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी ‘लोकमत’ला सांगितले. मात्र स्टेडियममधील कर्मचारीवर्ग व आयपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदररामन यांचे जबाब घेतले जातील, असे आणखी एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)