राजस्थानातील जोधपूर येथे झालेल्या साध्वी प्रेम बाईसा यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी आज पोलिसांनी अधिकृत खुलासा केला. "साध्वींचा मृत्यू 'कार्डियाक आणि पल्मोनरी अरेस्ट'मुळे झाला. एफएसएल (FSL) आणि हिस्टोपॅथॉलॉजी अहवालातून हे स्पष्ट झाले असून, विषबाधा अथवा कुठल्याही बाह्य कारणाने त्यांचा मृत्यू झालेला नाही. तसेच, त्यांचे कुठल्याही प्रकारचे लैंगिक शोषण झालेले नाही", असे पोलीस आयुक्त ओमप्रकाश पासवान यांनी म्हटले आहे.
पासवान यांनी सांगितले की, एका नर्सिंग कर्मचाऱ्याने साध्वींना 'शेड्यूल एच' श्रेणीतील इंजेक्शन दिले होते. या श्रेणीतील इंजेक्शन डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय देता येत नाही. हे इंजेक्शन देवी सिंह याने स्वतः आणले होते, मात्र अद्याप त्याची कोणतीही अधिकृत प्रिस्क्रिप्शन सापडलेली नाही. दरम्यान, इंजेक्शनमुळे कार्डियक आणि पल्मोनरी झटका आला असावा का? यावर ते म्हणाले, यासंदर्भात वैद्यकीय तज्ज्ञांचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे. तज्ज्ञांच्या अहवालात निष्काळजीपणा आढळल्यास, बीएनएस (BNS) आणि वैद्यकीय नियमांनुसार कठोर कारवाई केली जाईल, असे पोलीस आयुक्त पासवान यांनी स्पष्ट केले.
एसआयटीनं केला तपास, वडिलांची भूमिका काय? -या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाने (SIT) केला. आतापर्यंत ४४ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. १०६ मोबाईल क्रमांकांचे कॉल डिटेल्सदेखील तपासण्यात आले आहेत. साध्वींच्या वडिलांनी त्यांच्या मृत्यूनंतर लोक जमवण्यासाठी काही फोन केले होते. मात्र, ते भावनिक स्थितीत करण्यात आले होते. त्यांची भूमिका संशयास्पद आढळलेली नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे.
महत्वाचे म्हणजे, आयुक्तांनी असेही स्पष्ट केले आहे की, साध्वीने यापूर्वी दाखल केलेल्या खटल्यांशी संबंधित कुणाचाही या मृत्यू प्रकरणात सहभाग आढळला नाही. तसेच, न्यायाची मागणी करणारी सोशल मीडिया पोस्ट तिच्या वडिलांनी गर्दी जमवण्यासाठी केली होती. तपास सुरू असून तज्ञांच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल.
Web Summary : Police say Sadhvi Prem Baisa died of cardiac arrest; no foul play or sexual assault found. An unauthorized injection may be linked. Further medical reports are pending; investigation continues.
Web Summary : पुलिस के अनुसार साध्वी प्रेम बाईसा की मौत कार्डियक अरेस्ट से हुई; कोई गड़बड़ी या यौन हमला नहीं। एक अनाधिकृत इंजेक्शन का संबंध हो सकता है। आगे की मेडिकल रिपोर्ट लंबित; जांच जारी है।