शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

नव्या लोकसभेतील जवळपास निम्मे खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 4:23 PM

29 टक्के खासदारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे

नवी दिल्ली: नव्या लोकसभेतील जवळपास निम्मे सदस्य गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. विशेष म्हणजे निवडणूक लढताना उमेदवारांनी दाखल केलेल्या शपथपत्रातून ही माहिती समोर आली. गेल्या दोन्ही लोकसभांच्या तुलनेत यंदाच्या लोकसभेत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सदस्यांची (खासदारांची) संख्या जास्त आहे. याशिवाय गंभीर गुन्हे दाखल असलेल्या खासदारांची संख्यादेखील वाढली आहे.यंदाच्या लोकसभेतील 539 सदस्यांच्या शपथपत्रांमधील माहिती विचारात घेतल्यास, त्यातील 233 सदस्यांवर गुन्हे दाखल आहेत. 2009 च्या तुलनेत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सदस्यांचं प्रमाण 44 टक्क्यांनी वाढलं आहे. केरळच्या इडुक्की मतदारसंघातून निवडून गेलेले काँग्रेसचे डेन कुरिअकोसे यांच्याविरोधात तब्बल 204 गुन्हे दाखल आहेत. सदोष मनुष्यवध, चोरी यांच्यासारख्या गुन्ह्यांचा यात समावेश दाखल आहे. गेल्या दोन्ही लोकसभांच्या तुलनेत यंदा गुन्हेगारी सदस्यांचं प्रमाण वाढलं आहे. 2014 मध्ये लोकसभा निवडणूक झाली. त्यावेळी सदनातील 185 (34 टक्के) सदस्य गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले होते. तर 2009 मध्ये हेच प्रमाण 162 (30 टक्के) होतं. मात्र यंदा हे प्रमाण जवळपास निम्म्यावर पोहोचलं आहे. चिंताजनक बाब म्हणजे जवळपास 159 सदस्यांवर (29 टक्के) गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये बलात्कार, खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, महिलांविरोधात गुन्ह्यांचा समावेश आहे. एनडीएतील घटकपक्ष असलेल्या संयुक्त जनता दलाचे 80 टक्क्यांहून अधिक खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. संयुक्त जनता दलाचे 13 उमेदवार निवडून गेले. यातील 81 टक्के खासदारांवर गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर काँग्रेसचा क्रमांक लागतो. काँग्रेसच्या 51 पैकी 29 (57 टक्के) खासदारांवर गुन्ह्यांची नोंद आहे. द्रमुकचे 23 पैकी 11, तृणमूलचे 22 पैकी 9, तर भाजपाचे 301 पैकी 116 खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत.  

टॅग्स :lok sabhaलोकसभाMember of parliamentखासदारParliamentसंसदJanta Dal Unitedजनता दल युनायटेडcongressकाँग्रेसBJPभाजपाDravid Munnetra Kazhagamद्रविड मुनेत्र कझागम