शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

एनडीआरएफच्या तुकड्या आंध्रात

By admin | Updated: October 13, 2014 03:03 IST

हुडहुड’ चक्रीवादळ आंध्रातील विशाखापट्टणम येथे धडकताच राष्ट्रीय आपत्तीनिवारण कृती दलाने (एनडीआरएफ)मदत व बचाव कार्यासाठी आपल्या आणखी सात तुकड्या रवाना केल्या आहेत़

नवी दिल्ली : ‘हुडहुड’ चक्रीवादळ आंध्रातील विशाखापट्टणम येथे धडकताच राष्ट्रीय आपत्तीनिवारण कृती दलाने (एनडीआरएफ)मदत व बचाव कार्यासाठी आपल्या आणखी सात तुकड्या रवाना केल्या आहेत़ परिणामी आता विशाखापट्टणम येथे आता एनडीआरएफच्या एकूण १३ तुकड्या तैनात असतील़ एनडीआरएफच्या एका तुकडीत सामान्यत: ५० जण असतात़ आंध्र आणि ओडिशात मिळून एनडीआरएफच्या एकूण ४४ तुकड्या तैनात आहेत़येते सहा तास हुडहुड चक्रीवादळाची तीव्रता कायम राहणार आहेत़ तथापि ओडिशाच्या अंतर्गत भागात आणि छत्तीसगडसह उत्तर-पश्चिमकडे सरकताच पुढील आणखी सहा तासांत हुडहुडची तीव्रता कमी होणार आहे़ याच्या प्रभावामुळे तेलंगण, दक्षिण ओडिशाच्या शेजारील दक्षिण छत्तीसगडमध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असल्याचे हवामान खात्याने जारी केलेल्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे़ उत्तर आंध्रच्या पूर्व गोदावरी, विशाखापट्टणम, विजयनगरम आणि ओडिशाच्या गंजाम, गजपति, कोरापूट तसेच मल्कानगिरी जिल्ह्णात या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवेल़चक्रीवादळामुळे उद्भवू शकणारा संभाव्य धोका बघता कालच आंध्र किनारपट्टीवरील पाच जिल्ह्यांतील सुमारे १.११ लाख नागरिकांना तर ओडिशाच्या गंजम जिल्ह्णातील ३.५ लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. राष्ट्रीय आपत्ती मदत दलाची पथके १९९ रबरी नावांनिशी दोन्ही राज्यातील या आपत्तीला तोंड द्यायला सज्ज आहेत़ याखेरीज हवाईदलालाही हेलिकॉप्टर्स सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत़ (लोकमत न्यूज नेटवर्क)