बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 18:36 IST2025-11-04T18:35:26+5:302025-11-04T18:36:22+5:30
महत्वाचे म्हणजे, या सर्व्हेनुसार भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे. तर जेडीयूलाही मोठ्या प्रमाणावर जागा मिळण्याचा अंदाज आहे... काँग्रेसला किती जागा...?

बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर IANS-MATRIZE च्या आलेल्या नव्या ओपिनियन पोलने पुन्हा एकदा एनडीए सरकारचा अंदाज व्यक्त केला आहे. सर्वेक्षणानुसार एनडीएला या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, या सर्व्हेनुसार भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे. तर जेडीयूलाही मोठ्या प्रमाणावर जागा मिळण्याचा अंदाज आहे.
या सर्व्हेच्या आकडेवारीनुसार भाजपला 83 ते 87 एवढ्या जागा मिळण्याचा अंदाज आहे. याचबरोबर नीतीशकुमार यांच्या जनता दल (युनायटेड)ला 61 ते 65 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशा पद्धतीने एनडीएला एकूण 153 ते 164 एवढ्या जागा मिळू शकतात. तर मतांचा टक्का जवळपास 49 टक्क्यांपर्यंत पोहोचेल.
काँग्रेसला किती जागा? -
दुसरीकडे महागठबंधनाला मोठा झटका बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला 62 ते 66 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर संपूर्ण आघाडीला केवळ 76 ते 87 जागाच मिळण्याची शक्यता आहे. यांपैकी काँग्रेसला तर केवळ 7 ते 9 जागा आणि सीपीआय-एमएलला 6 ते 8 जागा मिळण्याचा अंदाज आहे. याशिवया मुकेश सहनी यांच्या व्हीआयपी पक्षाला 1 ते 2 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
आरजेडीला 22 टक्के, तर भाजपला 21 टक्के मते -
विश्लेषकांच्या मते, हा अंदाज खरा ठरला तर, ती मुख्यमंत्री नीतीशकुमार यांच्या 20 वर्षांच्या कामावरही मोहर असेल. मतांच्या टक्केवारीत आरजेडीला 22 टक्के, तर भाजपला 21 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. मात्र, भाजपला जागांच्या बाबतीत आघाडीवर राहील. कारण जेडीयू आणि लोजपासारख्या सहकारी पक्षांच्या मतांचा फायदा भाजपला मिळला आहे.