शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

कोळसा घोटाळा ही निव्वळ कॅगची कल्पना नव्हे नायडू : भाजपच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब झाल्याचा दावा

By admin | Updated: February 21, 2015 00:50 IST

नवी दिल्ली : कोळसा खाणपट्ट्यांसाठी धातू आणि सिमेंट कंपन्यांनी लावलेली चढ्या दराची बोली आणि लिलावाची यशस्विता पाहता कोळसा घोटाळा खरा असल्याचे आणि तो निव्वळ कॅगच्या कल्पनेतून समोर आला नसल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे भाजपच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब झाले असल्याचा दावा संसदीय कामकाज मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी केला आहे.

नवी दिल्ली : कोळसा खाणपट्ट्यांसाठी धातू आणि सिमेंट कंपन्यांनी लावलेली चढ्या दराची बोली आणि लिलावाची यशस्विता पाहता कोळसा घोटाळा खरा असल्याचे आणि तो निव्वळ कॅगच्या कल्पनेतून समोर आला नसल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे भाजपच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब झाले असल्याचा दावा संसदीय कामकाज मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी केला आहे.
कोळसा प्रकरणाची सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी भाजपने जोर लावला होता. कोणतेही नुकसान झाले नसल्याचा तत्कालीन अर्थमंत्र्यांनी केलेला दावा चुकीचा होता, असेही ते म्हणाले. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी कोणताही घोटाळा घडला नसल्याचा दावा केला होता.
देशाचे १.८६ लाख कोटी रुपयांचे प्रचंड नुकसान झाले असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. २० खाणींसाठी योग्य आणि पारदर्शकरीत्या लिलाव करण्याचा मोदी सरकारने घेतलेला निर्णय देशाच्या फायद्याचाच आहे. केवळ चार दिवसांमध्ये बोली ६० हजार कोटींच्या वर गेल्या आहेत. खनिजसंपन्न राज्यांना त्याचा अधिकाधिक लाभ होईल. सध्या १९ खाणपट्ट्यांचा लिलाव होत असून यापैकी १४ खाणपट्टे यापूर्वीच ८० हजार कोटी रुपयांना विकले गेले आहेत, अशी माहितीही नायडू यांनी दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
--------------------
१५ लाख कोटी मिळण्याची अपेक्षा
नव्या लिलाव प्रक्रियेतून १५ लाख कोटी रुपये गोळा होण्याची शक्यता आहे, तथापि अनेक बोली विश्लेषकांच्या अपेक्षेपलीकडे गेल्या आहेत. सर्वांत मोठा कोळसा ग्राहक असलेल्या देशांत अमेरिकेला मागे टाकत चीननंतर दुसरे स्थान भारताला मिळण्याची अपेक्षा आहे. मागणीनुसार पुरवठा करण्यात अपयश आल्यामुळे कोल इंडिया लिमिटेडचा कोळसा क्षेत्रातील एकाधिकार मोडीत काढण्यात आला आहे.