मोदींच्या चौकशीला राष्ट्रवादीचा विरोध

By Admin | Updated: May 4, 2014 14:21 IST2014-05-04T14:12:50+5:302014-05-04T14:21:25+5:30

हेरगिरी प्रकरणात नरेंद्र मोदींची न्यायालयीन चौकशी करण्यास काँग्रेसचा मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस व नॅशनल कॉन्फरन्सने विरोध दर्शवला आहे.

NCP's opposition to Modi's inquiry | मोदींच्या चौकशीला राष्ट्रवादीचा विरोध

मोदींच्या चौकशीला राष्ट्रवादीचा विरोध

 ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ४ - हेरगिरी प्रकरणात नरेंद्र मोदींची न्यायालयीन चौकशी करण्यास काँग्रेसचा मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस व नॅशनल कॉन्फरन्सने विरोध दर्शवला आहे. मतमोजणीच्या दहा दिवसांअगोदर मोदींविरोधात चौकशी समिती नियुक्त करणे योग्य नाही असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे.
बंगळुरुमधील एका आर्किटेक्ट महिलेवर गुजरात पोलिसांनी मोदींच्या आदेशावरुन पाळत ठेवल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी उच्च न्यायालयातील न्यायाधीशांमार्फत मोदींची चौकशी करण्याची तयारी केंद्र सरकारने केली होती. काँग्रेस नेते व केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व कपिल सिब्बल यांनी १६ मेपूर्वी न्यायाधीशांची नेमणूक करण्याची घोषणा केली होती. मात्र यावरुन आता सत्ताधारी युपीएत मतभेद निर्माण झाल्याचे दिसते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सद्यस्थितीत चौकशी समिती नेमणे उचीत ठरणार नाही असे म्हणत चौकशीला विरोधच दर्शवला आहे. यासंदर्भात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे पक्षाची भूमिका पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासमोर मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर राष्ट्रवादी पाठोपाठ आता नॅशनल कॉन्फरन्सचे नेते व जम्मू - काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीदेखील ट्विटरद्वारे या चौकशीला विरोध दर्शवला आहे. 'काल रात्री वडिलांसोबत (फारुख अब्दुल्ला) चर्चा करत असताना त्यांनी देखील मतमोजणीपूर्वी मोदींची चौकशी करणे उचीत ठरणार नाही' असे विधान केल्याचे ओमर अब्दुल्लांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Web Title: NCP's opposition to Modi's inquiry