शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत अजित पवारांसह NCP च्या प्रमुख नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट; चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 10:09 IST

अजित पवारांनी दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली त्यामुळे राजकीय भूमिकांमध्ये पवार कुटुंबातील संवाद कुठेही कमी झाला नसल्याचा संदेश या भेटीतून दिला जात आहे.

नवी दिल्ली - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. आज शरद पवारांचा वाढदिवस असून या निमित्ताने अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल पटेल, सुनेत्रा पवार, पार्थ पवार हे पवारांच्या भेटीला पोहचले. यावेळी राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवारही उपस्थित होत्या. या भेटीत अजित पवारांनी सपत्नीक शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच अजित पवार आणि शरद पवार एकत्र आल्याने चर्चांना उधाण आले आहे.

दिल्लीतील निवासस्थानी अजित पवारांसह पक्षातील प्रमुख नेते प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ हेदेखील शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते. अजित पवार कालपासून दिल्लीत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील दिल्लीत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेत आहेत. त्यात अजित पवारांनी दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली त्यामुळे राजकीय भूमिकांमध्ये पवार कुटुंबातील संवाद कुठेही कमी झाला नसल्याचा संदेश या भेटीतून दिला जात आहे. आगामी काळातील राजकीय घडामोडी, महाराष्ट्रातील राजकारण यातून या भेटीला विशेष महत्त्व आलं आहे.

कौटुंबिक भेट की राजकीय चर्चा?

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार हे दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी पोहचले. या दोन्ही नेत्यांची भेट कौटुंबिक सांगितली तरी या भेटीवेळी राष्ट्रवादीचे प्रमुख नेतेही उपस्थित होते. त्यात प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, सुनेत्रा पवार हेदेखील शरद पवारांच्या भेटीला गेल्याने या भेटीतून वेगळा संदेश राजकीय वर्तुळात गेला आहे. लोकसभेच्या पराभवानंतर अजित पवारांनी ताकदीने विधानसभा निवडणुकीत उभे राहिले. विधानसभा निवडणुकीत अजितदादांनी लोकसभेत केलेली चूक जाहीरपणे कबुल केली होती. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही या दोन्ही नेत्यांनी एकमेकांविरोधात वैयक्तिक टीका करणे टाळले होते. राजकारणात चांगले संबंध राहावेत यादृष्टीनेही संवाद महत्त्वाचा असतो असं शरद पवार कायम बोलतात. त्यामुळे ही भेट कौटुंबिक की राजकीय आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ८ जागांवर विजय मिळवला होता तर अजित पवारांच्या पक्षाने १ जागा जिंकली होती. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीला दमदार यश मिळालं, मात्र केंद्रातील एनडीए सरकार चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या पाठिंब्यावर टिकून आहे. त्यामुळे या भेटीतून भविष्यातील राजकीय गणिते जुळवण्याचा प्रयत्न आहे का किंवा राज्यातील महायुती सरकारमध्ये निकालानंतर नाराजीनाट्य पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी अजित पवार प्रयत्नशील आहेत. त्यादृष्टीनेही ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.  

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारPraful Patelप्रफुल्ल पटेलChhagan Bhujbalछगन भुजबळ