शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सत्तेत आल्यानंतर देशात जातीयद्वेषाचे विष वाढत आहे: शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 16:30 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

ठळक मुद्देशरद पवार यांची पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर टीकाभाजप सत्तेत आल्यानंतर देशात जातीयद्वेषाचे विष वाढत आहे - शरद पवारशरद पवार यांनी जागवल्या महेंद्रसिंह धोनीच्या आठवणी

रांची : केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा (Assembly Elections 2021) कार्यक्रम जाहीर केल्यानंतर प्रचाराला आता वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) बंगालमध्ये प्रचाराचे रणशिंग फुंकणार असून, मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही पेट्रोल-डिझेल आणि गॅस दरवाढीविरोधात पदयात्रा करणार आहेत. दुसरीकडे केंद्रीय कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. या एकूणच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भाजप सत्तेत आल्यानंतर देशात जातीयद्वेषाचे विष वाढत आहे, असा आरोप शरद पवार यांनी केला. (ncp leader sharad pawar criticized that bjp spreading communal poison in country)

रांची येथील हरमू मैदानात आयोजित केलेल्या एका सभेत शरद पवार बोलत होते. बंधूभाव प्रस्थापित करणे ही केंद्राची जबाबदारी आहे, परंतु भाजपा देशात जातीयद्वेषाचं विष  पसरवत आहे. गेल्या १०० दिवसांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. पंतप्रधानांना कोलकाता येथे जाण्यास, पश्चिम बंगाल सरकारविरोधात रॅली काढण्यास वेळ आहे. परंतु, दिल्लीतील शेतकऱ्यांना भेटायला त्यांच्याकडे वेळ नाही, या शब्दांत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. 

टीम इंडियाची जबाबदारी धोनीवर

भारतीय क्रिकेटमध्ये मोठे योगदान देणाऱ्या माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आहे. भारताच्या इंग्लंड दौर्‍यादरम्यान राहुल द्रविडने मला सांगितले की, कर्णधारपदाच्या जबाबदारीमुळे त्यांच्या खेळावर परिणाम होत आहे आणि त्याला राजीनामा द्यायचा आहे. या परिस्थितीत सचिन तेंडुलकर यांना कर्णधार होण्यासंदर्भात विचारणा केली. मात्र, त्यानेही नकार दिला, असे शरद पवार यांनी सांगितले.

"महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट अशक्य, जनता महाविकास आघाडीच्या कामावर समाधानी"

त्यावेळी देशाचे नेतृत्व कोण करणार?, असे सचिनला विचारले असता, त्याने धोनीच्या नावाची शिफारस केली. आपल्याकडे एक खेळाडू आहे, जो जगभरात भारतीय क्रिकेट लोकप्रिय करू शकतो, असे सचिनने सांगितले. त्यानंतर धोनीला जबाबदारी देण्यात आली. धोनीच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेटला जगभरात मान्यता मिळाली, अशी आठवण शरद पवार यांनी यावेळी सांगितली. 

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट अशक्य

दरम्यान, भाजप खासदार नारायण राणे यांनी सुरुवातीला सरकार टिकणार नाही, फाटाफूट होऊन भाजपची सत्ता येईल, असा दावा केला होता. मात्र, या गोष्टीला आता १५ महिने उलटून गेल्यानंतर हा बाजा वाजवणे बंद केले. आता ते पुन्हा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार आहेत. कारण, भाजपकडे दुसरा पर्याय नाही, पण हे अशक्य आहे. कोणत्याही राज्यात अशीच कुणालाही राष्ट्रपती राजवट लागू करता येत नाही, असे नवाब मलिक यांनी यावेळी बोलताना सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाFarmers Protestशेतकरी आंदोलनPoliticsराजकारण