हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 20:04 IST2025-11-22T20:01:58+5:302025-11-22T20:04:39+5:30
37 Naxal Surrender in Hyderabad: आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये हिडमाचा जवळचा सहकारी कोयदा संबैयाचा समावेश.

हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
Naxal Leader Surrender: केंद्र सरकारच्या नक्षलवादविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. कुख्यात नक्षलवादी हिडमाच्या मृत्यूनंतर आता, प्रतिबंधित नक्षलवादी संघटना भाकपा (माओवादी) च्या 37 सदस्यांनी हैदराबादमध्ये एकाचवेळी शरणागती पत्करली आहे. समर्पण करणाऱ्यांमध्ये हिडमाचा जवळचा साथीदार कोय्याडा सम्बैयाह उर्फ आजाद याचाही समावेश आहे. आजाद हा मुलुगू जिल्ह्याचा रहिवासी असून तो तब्बल 31 वर्षे अंडरग्राउंड होता.
समर्पित नक्षलींच्या ताब्यातून 8 बंदुका, एक AK-47 रायफल आणि मोठ्या प्रमाणात गोळाबारुद जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, शरणागती स्वीकारणाऱ्यांमध्ये 25 महिला नक्षलवाद्यांचाही समावेश आहे. तेलंगानाचे पोलिस महासंचालक बी. शिवधर रेड्डी यांनी सांगितले की, हा माओवादी संघटनेसाठी अलीकडच्या वर्षांतील सर्वात मोठ्या आघातांपैकी एक आहे.
पत्करणाऱ्यांमध्ये संघटनेचे तीन महत्त्वाचे नेते :
कोय्याडा सम्बैयाह उर्फ आजाद
अप्पासी नारायण उर्फ रमेश
मुचाकी सोमाडा उर्फ एर्रा
हे तिघेही आंध्र-तेलंगाना सीमेवर आणि दक्षिण बस्तर परिसरात सक्रिय होते. अनेक नक्षली कारवायांमध्ये सहभागी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
राज्य सरकारच्या पुनर्वसनाच्या आवाहनाचा प्रभाव
DGP यांच्या मते, 37 नक्षलवाद्यांनी हा निर्णय एकत्र घेतला. राज्य सरकारने अलीकडेच हिंसा सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केले होते, त्याचा या नक्षलवाद्यांवर मोठा प्रभाव पडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सततच्या अँटी-नक्षल ऑपरेशन्स, विचारधारेतील मतभेद, गटांतर्गत तणाव, हालचालींवरील मर्यादा यामुळे CPI (माओवादी) संघटना या भागात कमकुवत झाली आहे. समर्पण केलेल्या स्टेट कमिटी सदस्यांना 20 लाख रुपये, तर एकूण जप्त इनामाची रक्कम 1 कोटी 41 लाख 5 हजार रुपये दिले जातील.
काही दिवसांपूर्वीच कुख्यात हिडमा ठार
या मोठ्या शरणागतीच्या काही दिवस आधी कुख्यात नक्षली कमांडर माडवी हिडमा (43) याला आंध्र प्रदेशमध्ये सुरक्षा दलांनी ठार केले. हिडमा 2013 च्या दरभा घाटी हत्याकांड, 2017 च्या सुकमा हल्ल्यांसह किमान 26 मोठ्या नक्षली हल्ल्यांचा मास्टरमाइंड मानला जात होता.