Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 12:47 IST2025-05-08T12:45:17+5:302025-05-08T12:47:34+5:30

Naxal News Latest: देशातील नक्षलवाद्यांच्या बिमोड करण्यासाठी मिशन संकल्प मोहीम हाती घेण्यात आली असून, बुधवारी २३ नक्षलवाद्यांच्या चकमकीत खात्मा करण्यात आला. त्यानंतर नक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात तीन जवान शहीद झाले.

Naxal Attack: Three soldiers martyred in Naxalite landmine blast; Encounter breaks out in Telangana forest | Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक

Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक

Naxal news latest marathi: छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या जंगलात नक्षलवाद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत पोलीस दलाच्या तीन जवानांना वीरमरण आले. नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी भूसुरुंग स्फोटात तीन पोलीस जवान शहीद झाले, तर तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे. ही घटना गुरुवारी घडली. या परिसरात सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये तुफान चकमक सुरू आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

तेलंगणातील मुलुगू जिल्ह्यातील जंगलामध्ये नक्षलवादी लपलेले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या ग्रेहाऊंड टीममधील जवान आणि पोलिसांनी संयुक्तपणे सर्च ऑपरेशन सुरू केले. 

वाचा >>महिनाभरासाठी तरी युद्धविराम करा; माओवाद्यांची आता विनवणीची भाषा

मुलुगूच्या जंगलात जवान पोहोचताच नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट केला. या स्फोटात तीन जवान शहीद झाले. या घटनेनंतर छत्तीसगडमध्येही अलर्ट देण्यात आला. 

भूसुरूंग स्फोट होताच नक्षलवाद्यांकडून अंदाधूंद गोळीबार

नक्षलवाद्यांनी आधी जवानांना भूसुरुंग स्फोट करून लक्ष्य केले. स्फोट झाल्यानंतर जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी सुरक्षा जवानांच्या दिशेने अंदाधूंद गोळीबार सुरू केला. या गोळीबार तीन जवान जखमी झाले. 

चकमकीत जखमी झालेल्या जवांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे. तेलंगणा-छत्तीसगड भागात असलेल्या या जंगलात ही घटना घडल्यानंतर छत्तीसगडमधील सुरक्षा यंत्रणांना आणि पोलिसांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला. कारण तेलंगणा सीमेला लागून असलेल्या छत्तीसगडमधील कर्रेगुट्टा जंगलातही मिशन संकल्प ऑपरेशन सुरु आहे. 

२२ नक्षलवाद्यांचा खात्मा 

७ मे रोजी कर्रेगुट्टाच्या जंगलामध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीत २२ नक्षलवादी ठाक झाले आहेत. २१ एप्रिल पासून या भागात नक्षलवाद्यांविरोधात मिशन संकल्प मोहीम सुरू आहे. 

Web Title: Naxal Attack: Three soldiers martyred in Naxalite landmine blast; Encounter breaks out in Telangana forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.