शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Navjot Singh Sidhu : नवज्योत सिंग सिद्धू 10 महीन्यानंतर तुरुंगातून बाहेर येणार; 'या' प्रकरणात झाली शिक्षा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 14:42 IST

नवज्योत सिंग सिद्धू यांना 19 मे 2022 रोजी कोर्टाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.

Navjot Singh Sidhu :काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांची तुरुंगातून सुटका होणार आहे. सिद्धू यांच्या ट्विटर हँडलवरुन ही माहिती देण्यात आली आहे. 1988 सालच्या रोड रेज प्रकरणी सिद्धूला गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली होती. गेल्या 10 महिन्यांपासून ते तुरुंगात आहेत. सिद्धूने मित्रासोबत मिळून एका व्यक्तीला बेदम मारहाण केली होती. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मात्र, त्या व्यक्तीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे.

निर्दोष, दोषी, निर्दोष, दोषी...या प्रकरणात सिद्धू यांची कनिष्ठ न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. पण हायकोर्टाने सिद्धूला 3 वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर सिद्धूच्या वतीने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. 15 मे 2018 रोजी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नवज्योत सिद्धूला एक हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. मात्र मे 2018 मध्ये पीडितेच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल केली. यावर सुनावणी करत सर्वोच्च न्यायालयाने 19 मे 2022 रोजी सिद्धू यांना एक वर्षाची शिक्षा सुनावली.

काय प्रकरण आहे?27 डिसेंबर 1988 च्या संध्याकाळी सिद्धू त्याचा मित्र रुपिंदर सिंग संधूसोबत पटियालाच्या शेरावाले गेट मार्केटमध्ये होता. त्यावेळी सिद्धू हा क्रिकेटपटू होता आणि त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला वर्षभरापूर्वीच सुरुवात झाली होती. मार्केटमध्ये कार पार्किंगवरुन 65 वर्षीय गुरनाम सिंग याच्याशी त्यांचा वाद झाला. प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. सिद्धूने गुरनाम सिंगला मारहाण केली. रुग्णालयात उपचारादरम्यान गुरनाम सिंग यांचा मृत्यू झाला. त्याच दिवशी कोतवाली पोलिस ठाण्यात सिद्धू आणि त्याच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सिद्धूच्या पत्नीला स्टेज-2 कॅन्सर नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीला स्टेज 2 कर्करोगाचे निदान झाले आहे. पंजाबच्या माजी मंत्री असलेल्या नवज्योत कौर सिद्धू यांनी या आजाराचे निदान झाल्यानंतर ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. नवज्योत कौर सिद्धू यांनी पती नवज्योत सिंह सिद्धू यांना एक भावूक  पत्र लिहून आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली आहे. त्यांनी पत्रात लिहिले की, नवज्योत सिंग सिद्धू एका अशा गुन्ह्यासाठी तुरुंगात आहेत, जो त्यांनी केलेलाच नाही. मी दररोज तुमची बाहेर येण्याची वाट पाहत आहे. पण, मला आता माफ करा. तुमची वाट मी पाहू शकत नाही. कारण मला स्टेज-2 कॅन्सर आहे. आज सर्जरी होणार आहे. कोणाला दोष देणार, हीच देवाची मर्जी आहे, असे त्या म्हणाल्या.  

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूcongressकाँग्रेसPunjabपंजाबjailतुरुंग