शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

तुरुंगात असलेल्या नवज्योत सिंग सिद्धूंवर मोठं संकट, पत्नीला गंभीर आजाराचं निदान, भावूक पत्र लिहीत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 18:38 IST

Navjot Singh Sidhu: भारताचे माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू एका खटल्यात दोषी ठरल्याने सध्या तुरुंगवास भोगत आहेत. दरम्यान, तुरुंगात असलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर मोठं संकट कोसळलं आहे.

भारताचे माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू एका खटल्यात दोषी ठरल्याने सध्या तुरुंगवास भोगत आहेत. दरम्यान, तुरुंगात असलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर मोठं संकट कोसळलं आहे. सिद्धू यांच्या पत्नीला स्टेज २ कर्करोगाचं निदान झालं आहे. पंजाबच्या माजी मंत्री असलेल्या नवज्योत कौर सिद्धू यांनी या आजाराचे निदान झाल्यानंतर ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

तसेच नवज्योत कौर सिद्धू यांनी पती नवज्योत सिंह सिद्धू यांना एक भावूक  पत्र लिहून आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. त्यांनी पत्रात लिहिले की, नवज्योत सिंग सिद्धू एका अशा गुन्ह्यासाठी तुरुंगात आहेत. जो त्यांनी केलेलाच नाही. माफ करा त्या सर्वांना जे या सर्वात सहभागी आहेत. तुरुंगाबाहेर प्रत्येक दिवशी तुमची वाट पाहणं मला तुमच्यापेक्षा अधिक दु:खदायी आहे. नेहमीप्रमाणे मी तुमच्या वेदना वाटून घेण्याचा प्रयत्न करते.  मला माहिती आहे की, हे खूप वाईट आहे, मात्र त्यात काही सुधारणा होत आहे.

नवज्योत सिंग सिद्धू सध्या पंजाबमधील पतियाळा तुरुंगात आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशानंतर रोडरेज प्रकरणात ते एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहेत. नवज्योत कौर यांनी आपल्या ट्विटमध्ये आपल्याला स्टेज-२ कॅन्सर असल्याचे सांगितले आहे. तसेच त्यासाठी मी कुणालाही दोष देऊ शकत नाही. कारण ही देवाची मर्जी आहे, असे सांगितले.

नवज्योत सिंग सिद्धू यांना लिहिलेल्या पत्रात नवज्योत कौर लिहितात की, मी वारंवार न्यायासाठी विनंती केली. मात्र न्याय मिळाला नाही. मी तुमची वाट पाहत राहिले. सत्य शक्तिशाली असतेय मात्र ते प्रत्येकवेळी परीक्षा घेते. कलियुग आहे. माफ करा. तुमची वाट पाहू शकत नाही. कारण मला स्टेज-२ कॅन्सर आहे. आज सर्जरी होणार आहे. कुणालाही दोष देता येणार नाही. कारण ही देवाची मर्जी आहे.  

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूcongressकाँग्रेसFamilyपरिवार