नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 21:06 IST2025-04-29T21:01:28+5:302025-04-29T21:06:24+5:30

Navjot Singh Sidhu News: नवज्योत सिंग सिद्धू यांनी उद्या आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित केली आहे.

Navjot Singh Sidhu News: Will Navjot Singh Sidhu join BJP? This post attracted attention | नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

Navjot Singh Sidhu News:पंजाबकाँग्रेसचे वरिष्ठ नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. सिद्धूंनी मंगळवारी (29 एप्रिल) आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'मी उद्या (30 एप्रिल) माझ्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू करणार आहे.' यासाठी त्यांनी सर्व पत्रकारांना आपल्या अमृतसरमधील निवासस्थानी येण्याचे आमंत्रणही दिले आहे.

भाजप प्रवेशाची चर्चा
दरम्यान, सिद्धू यांच्या पोस्टवर युजर्स विविध प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक विचारत आहेत की, तुम्ही पुन्हा भाजपमध्ये जाणार का? तर काही लोक आम आदमी पक्षात जाणार का? असे प्रश्न विचारत आहेत. अनेकजण त्यांना नवीन सुरुवातीसाठी शुभेच्छाही देत आहेत. 

सिद्धू सक्रिय राजकारणापासून दूर
नवज्योत सिंग सिद्धू बऱ्याच काळापासून सक्रिय राजकारणापासून दूर आहेत. गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीतही सिद्धू यांनी पक्षासाठी एकही रॅली काढली नाही. तसेच, पंजाबमध्ये झालेल्या चार पोटनिवडणुकांमध्येही ते पक्षाचा प्रचार करताना दिसले नाहीत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यामध्ये त्यांना विचारण्यात आले होते की, ते सक्रिय राजकारणात कधी परतणार? त्यावर त्यांनी उत्तर दिले होते की, हा निर्णय पक्षाच्या हाय कमांडने घ्यायचा आहे.

2017 मध्ये काँग्रेस प्रवेश
नवज्योत सिंग सिद्धू यांनी 2016 मध्ये भाजपचा राजीनामा दिला होता. त्यानंतर 2017 मध्ये ते काँग्रेसमध्ये सामील झाले. त्यांनी अमृतसर पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकल्यानंतर काँग्रेस सरकारमध्ये मंत्रीही झाले. पण, 2019 मध्ये त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. 

Web Title: Navjot Singh Sidhu News: Will Navjot Singh Sidhu join BJP? This post attracted attention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.