शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महत्वाचे- आतील पान

By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST

उत्तराखंडमधील अपघातात आठ ठार

उत्तराखंडमधील अपघातात आठ ठार
डेहराडून- उत्तराखंडमध्ये टनकपूर- तवाघाट मार्गावर रविवारी एक जीप खड्ड्यात कोसळून झालेल्या अपघातात आठजण ठार तर एक गंभीर जखमी झाला. मृतांमध्ये पिथौरागडमध्ये तैनात एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. ही जीप हल्द्वानी येथून धारचुलाला जात होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

न्यायालयात आरोपीची गोळ्या घालून हत्या
मुजफ्फरनगर- येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सोमवारी इ.स.२०११ सालच्या एका प्रकरणातील आरोपीची न्यायालय कक्षातच गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मृताचे नाव विक्की त्यागी असे असून तो गँगस्टार होता. वकिलाच्या वेषात आलेल्या हल्लेखोराला नंतर पोलिसांनी अटक केली.

राजस्थानात विविध गुन्ह्यांमध्ये ७२६ जणांना अटक
जयपूर- पोलिसांकडून गुन्हेगारी कारवाया करणाऱ्यांविरुद्ध राबविण्यात येणाऱ्या मोहिमेअंतर्गत गेल्या आठवडाभरात विविध गुन्ह्यातील ७२६ लोकांना अटक करण्यात आली. पोलीस प्रवक्त्याने सोमवारी याबाबत माहिती दिली.

काश्मीर खोऱ्यात हिमवर्षाव
श्रीनगर- गुलमर्गसह उत्तर काश्मिरात बहुतांश भागात सोमवारी पुन्हा हिमवर्षाव झाल्याने स्थानिक लोकांना थंडीच्या लाटेपासून किंचित दिलासा मिळाला. हवामान विभागाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार प्रसिद्ध स्की रिसोर्ट गुलमर्गमध्ये चार इंच हिमवर्षावाची नोंद झाली.

निष्काळजीपणे वाहन चालविणाऱ्यास १५ महिने कारावास
नवी दिल्ली- दिल्लीच्या एका न्यायालयाने २००३ साली निष्काळजीपणे वाहन चालविल्याने एका व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल आरोपी वाहनचालकाची १५ महिने कारावासाची शिक्षा कायम ठेवली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश रविंद्र कौर यांनी हरियाणाचा रहिवासी सुरेश याची न्यायदंडाधिकाऱ्याच्या आदेशाविरुद्ध दाखल केलेली याचिका फेटाळून लावली.

आदिवासी महिलेचे शोषण
महिला डॉक्टरला अटक
फुलबनी (ओडिशा)- गरोदार आदिवासी महिलेला त्रास देऊन तिचे शोषण केल्याच्या आरोपात पोलिसांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील एका महिला डॉक्टरला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला सदर डॉक्टरकडे घरकाम करीत होती.

राजस्थानात स्वाईन फ्लूचे १६५ बळी
जयपूर- राजस्थानात गेल्या २४ तासात स्वाईन फ्लूने आणखी १२ लोकांचा मृत्यू झाला असून यासोबतच राज्यात या आजाराने मरणाऱ्यांची संख्या १६५ झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागातर्फे सोमवारी ही माहिती देण्यात आली.

न्यायालय परिसरात कैद्यावर चाकू हल्ला
नवादा- बिहारच्या नवादा जिल्ह्यातील न्यायालय परिसरात सोमवारी एका गुंडाने सुनावणीसाठी आणलेल्या कच्चा कैद्यावर चाकूने हल्ला केला. पोलीस अधीक्षक संजयकुमार पांडेय यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, हल्लेखोर दिलीप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

त्या जवानाचा गोळीबार खासगी वैमनस्यातून
गुवाहाटी- तेजपूरमध्ये रविवारी रात्री आसाम रायफल्सच्या एका जवानाने केलेला गोळीबार हा खासगी वैमनस्यातून होता आणि बंडखोरांविरुद्ध मोहिमेचा त्याच्याशी काहीही संबंध नाही,असा खुलासा सोमवारी लष्करातर्फे करण्यात आला. या गोळीबारात दोनजण ठार तर एक महिला जखमी झाली होती.