शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

नथुराम गोडसे भक्ताने केला काँग्रेसमध्ये प्रवेश; कमलनाथ यांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 3:23 PM

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर पालिकेचे नगरसेवक आणि हिंदू महासभेचे नेते बाबूलाल चौरसिया यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. सन २०१७ मध्ये नथुराम गोडसे यांच्या प्रतिमेचे उद्घाटन करणाऱ्यांमध्ये बाबूलाल चौरसिया यांचा सक्रीय सहभाग होता. तसेच महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याची शपथ घेतल्यामुळे ते चर्चेत आले होते. नगरसेवक बाबुलाल चौरसिया यांच्या पक्षप्रवेशासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ उपस्थित होते.

ठळक मुद्देमी जन्मापासूनच काँग्रेसवाला - बाबुलाल चौरसियाकमलनाथ यांच्या उपस्थितीत बाबुलाल चौरसिया यांचा काँग्रेस प्रवेश२०१७ मध्ये नथुराम गोडसे यांच्या प्रतिमा उद्घाटन कार्यक्रमात बाबुलाल चौरसिया यांची उपस्थिती

भोपाळ : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर पालिकेचे नगरसेवक आणि हिंदू महासभेचे नेते बाबूलाल चौरसिया यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. सन २०१७ मध्ये नथुराम गोडसे यांच्या प्रतिमेचे उद्घाटन करणाऱ्यांमध्ये बाबूलाल चौरसिया यांचा सक्रीय सहभाग होता. तसेच महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याची शपथ घेतल्यामुळे ते चर्चेत आले होते. नगरसेवक बाबुलाल चौरसिया यांच्या पक्षप्रवेशासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ उपस्थित होते. (nathuram godse bhakt babulal chaurasia joins congress in presence of kamal nath) मध्य प्रदेशात पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश पार पडला. मध्य प्रदेश काँग्रेसकडून बाबुलाल चौरसिया यांच्या पक्षप्रवेशाचे फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे बाबुलाल चौरसिया यांनी यापूर्वी काँग्रेस पक्षाला रामराम करत हिंदू महासभेत प्रवेश केला होता. हिंदू महासभेच्या तिकिटावर पालिका निवडणूक लढत जिंकली होती. 

हज यात्रेला जाणारा भारतीय हिंदू म्हणूनच ओळखला जातो: योगी आदित्यनाथ

मी जन्मापासूनच काँग्रेसवाला

मी जन्मापासूनच काँग्रेसवाला आहे. नथुराम गोडसे यांना श्रद्धांजली वाहण्याच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी आपल्याला भाग पाडण्यात आले, असा आरोप करत आपण यापूर्वीही काँग्रेसमध्ये होतो. आपण कुटुंबात पुन्हा परतलो आहे, असे बाबुलाल चौरसिया म्हणाले. 

गांधी कुटुंब मोठ्या मनाचे

काँग्रेसने राहुल गांधींचा उल्लेख करत बाबुलाल चौरसिया यांचा पक्षप्रवेश कसा योग्य आहे, याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. यापूर्वी ते काँग्रेसमध्ये होते. हिंदू महासभेकडून निवडणूक लढत ते नगरसेवक म्हणून निवडून आले. गांधी कुटुंब मोठ्या मनाचे आहे. त्यांच्या याच आदर्श मूल्यांमुळे गोडसेची पूजा करणारा व्यक्ती गांधींची पूजा करत आहे, असे ग्वाल्हेरमधील काँग्रेस आमदार प्रवीण पाठक यांनी सांगितले.

कमलनाथ यांनीच प्रश्नाचे उत्तर द्यावे

कमलनाथ यांनी शिवराज सिंग चौहान यांना ते महात्मा गांधींसोबत आहात की, नथुराम गोडसेसोबत अशी विचारणा केली होती, आता कमलनाथ यांनीच या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे,असे टोला भाजपा प्रवक्ते राहुल कोठारी यांनी लगावला आहे. 

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपाNathuram Godseनथुराम गोडसेMadhya Pradeshमध्य प्रदेश