शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
2
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
3
होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला!
4
Nashik TCS Case: निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती
5
Robot World Record : माणसालाही हरवलं! रोबोटनं धावण्याच्या शर्यतीत मोडला जागतिक विक्रम; पाहा थरारक वेग
6
महाराष्ट्रातले साडेतीन पक्ष भाजपपुढे टिकाव धरतील?
7
आजचे राशीभविष्य, ०८ मे २०२६: मेष राशीला व्यवसायात लाभ, 'या' लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे!
8
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
9
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
10
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
11
JNPA Port : ‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले; २२ हजार कंटेनरची हाताळणी
12
रक्ताची ‘बंगाली’ चटक; हिंसाचाराच्या आगीत होरपळणारा बंगाल
13
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
14
लोणावळ्यात धक्कादायक घटना! जन्मदात्या पित्याकडून लेकीवर अत्याचार, दीड वर्षानंतर गुन्हा दाखल
15
कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल
16
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
17
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
18
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
19
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
20
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
Daily Top 2Weekly Top 5

नरखेड....

By admin | Updated: December 19, 2014 22:56 IST

नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटपात भ्रष्टाचार

नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटपात भ्रष्टाचार
मन्नाथ (खेडी) येथील प्रकार : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत नाही
नरखेड : तालुक्यातील अनेक गावांमध्ये २०१४ ला झालेल्या गारपीट व अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोहगाव (भदाडे) येथे प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी त्यांनी नुकसानग्रस्तांना अनुदान देण्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. परंतु, संबंधित अधिकारी व तलाठ्यांनी संधी साधून खोटी नुकसान दाखवून अनुदान वाटप केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
नुकसानग्रस्त शेतावर वा प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून माहिती न घेता मर्जीतील व पैसे देणाऱ्या शेतकऱ्यांची नावे नुकसानग्रस्तांच्या यादीत समाविष्ट केली. तसेच अनुदान वाढवून दिले असल्याचा प्रकार तालुक्यातील मन्नाथ (खेडी) येथे उघडकीस आला आहे. यासंदर्भात माहिती अधिकारात उमेश सोमकुवर यांनी कार्यालयाचे हेलपाटे मारल्यानंतर या प्रकरणातील गांभीर्य उघड झाले आहे. याबाबत पितळ उघडे पळल्यानंतर तलाठी के.के. कोरे यांनी माहिती अधिकार कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसांत खोटी तक्रार दाखल केली आहे.
सन २०१३-२०१४ या वर्षात अतिवृष्टी व गारपीट झाल्याने शासनाने नुकसानीचा सर्व्हे करण्याचे आदेश दिले. या अनुदान वाटपात मोठा घोळ उघडकीस आला. मन्नाथ खेडी, गोवार, गोंदी या गावातील ज्या शेतकऱ्यांचे १०० टक्के नुकसान झाले, त्यांची नावे अनुदान वाटप यादीत दिसले नाही. मात्र, ज्यांचे नुकसान झाले नाही, त्यांना १०० टक्के अनुदान देण्यात आले. याबाबत उमेश सोमकुवर यांनी तहसीलदार यांच्याकडे माहिती अधिकारात अपील दाखल केली.