नवी दिल्ली - 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने स्वबळावर 300 हून अधिक जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली होती. गेल्या वर्षभरात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने अनेक निर्णघ घेतले असून, त्या निर्णयांबाबत उलटसुटल प्रतिक्रिया जनमानसात उमटत आहेत. दरम्यान, नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासारख्या कायद्यावरून देशात असंतोष असल्याचे दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज देशात लोकसभेची निवडणूक झाल्यास देशात पुन्हा मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाचीच सत्ता येईल, असा अंदाज एबीपी आणि सी-व्होटरच्या सर्व्हेने वर्तवला आहे. तर महाराष्ट्रात मात्र भाजपाला धक्का बसणार आहे.
आजच्या घडीचा देशातील कल जाणून घेण्यासाठी एबीपी-सीव्होटरने लोकसभेच्या 543 मतदारसंघातील 30 हजार 240 लोकांशी चर्चा करून माहिती घेतली आहे. या सर्व्हेनुसार आज निवडणूक झाली तर मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएला 330 जागा मिळतील. 2019 च्या तुलनेत आज निवडणूक झाल्यास एनडीएला 23 जागांचे नुकसान होणार आहे. तर यूपीएला 130 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. 2019 च्या तुलनेत यूपीएला 34 जागांचा फायदा होताना दिसत आहे. तर इतर पक्षांना 83 जागा मिळणार आहेत.
Mann Ki Baat: हिंसा कुठल्याही समस्येवरचा उपाय नाही - नरेंद्र मोदीRepublic Day 2020: प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोडली ४८ वर्षाची 'ही' परंपराअर्थसंकल्पाआधी मोदी सरकारसाठी आणखी एक वाईट बातमी; देशाची चिंता वाढणार
या सर्व्हेमधून मोदी सरकारच्या कामगिरीविषयी विचारणा केली असता सुमारे 56 टक्के लोकांनी मोदींच्या कामगिरीवर खूप समाधानी असल्याचे सांगितले. तर 24 टक्के लोकांनी मोदी सरकारच्या कामगिरीवर समाधानी असल्याचे सांगितले. 20 टक्के लोकांनी मात्र मोदी सरकारच्या कामगिरीवर असमाधानी असल्याचे मत नोंदवले.