शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

Coronavirus : पंतप्रधान मोदी आणि राष्‍ट्रपती पुतीन यांच्यात महत्वपूर्ण चर्चा, फोनवरून साधला संवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 12:02 AM

कोरोना व्हायरसने जागतिक महास्ता म्हणवून घेणाऱ्या अमेरिकेचीही कंबर तोडली आहे. तेथे मृतांचा आकडा 770वर जाऊन पोहोचला आहे. इटली, स्‍पेनसारखे विकसित देशही कोरोनापुढे हतबल झाले आहेत. मात्र, रशियात आतापर्यंत कोरोनामुळे केवळ एकाचाच मृत्यू झाल्याचे समजते.

ठळक मुद्देउभय देशांच्या नेत्यांमध्ये कोरोनाबरोबरच्या लढाईत सहकार्यावर सहमती भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा 600 वर रशियात 650 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण

नवी दिल्‍ली - कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. मोठ-मोठे देशही या व्हायरसपुढे हतबल होताना दिसत आहेत. यातच आज (बुधवारी) सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यात फोनवर चर्चा झाली. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये झालेली ही चर्चा अत्यंत महत्वाची मानली जात आहे.  कोरोना व्हायरसने जागतिक महास्ता म्हणवून घेणाऱ्या अमेरिकेचीही कंबर तोडली आहे. तेथे मृतांचा आकडा 770वर जाऊन पोहोचला आहे. इटली, स्‍पेनसारखे विकसित देशही कोरोनापुढे हतबल झाले आहेत. मात्र, रशियात आतापर्यंत कोरोनामुळे केवळ एकाचाच मृत्यू झाल्याचे समजते. रशिया या व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झाला आहे. यासंदर्भातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्रपती व्‍लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा केली.

या दोन्ही नेत्यांमध्ये कोरोनाच्या सध्यस्थितीवर चर्चा झाली. यावेळी पंतप्रधानांनी रशियातील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात रशियन अधिकाऱ्यांनी केलेल्या सहकार्याची प्रशंसा केली. तसेच असेच सहकार्य यापुढेही मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच यावेळी राष्ट्रपती पुतीन यांनीही भविष्यात अशाच प्रकारे सहकार्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनीही पुतीन यांना भारतात अडकलेले सर्व रशियन नागरिक सुखरूप परततील, त्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले आहे. 

कोरोनाबरोबरच्या लढाईत सहकार्यावर सहमती -राष्‍ट्रपती पुतीन यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी भारतात करण्यात येत असलेल्या उपाय योजनांबद्दल पंतप्रधान मोदींची प्रशंसा केली. यावेळी या जागतीक संकटाचा सामना करण्यासाठी परस्‍पर सहकार्य करण्यावरही या दोन्ही नेत्यांत सहमती झाली. रशियातील भारतीय नागरिक आणि भारतातील रशियन नागरिकांच्या सुरक्षेसंदर्भात उचलण्यात येत असलेल्या पावलांसंदर्भातही  मोदी आणि पुतीन यांनी एकमेकांचे आभार मानले. 

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून देशातील मृतांच्या संख्येतही वाढ होत आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 13वर पोहोचली आहे. तर भारतात आतापर्यंत 600 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. रशियातही 650 हून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून तेथे आतापर्यंत एकाचाच कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समजते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीVladimir Putinव्लादिमीर पुतिनrussiaरशियाIndiaभारतdelhiदिल्लीPresidentराष्ट्राध्यक्ष