अमेरिकेनंतर इजिप्तच्या मशिदीत जाणार PM मोदी; 'या' मुस्लिम समुदायाशी जिव्हाळ्याचे संबंध...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 09:42 PM2023-06-23T21:42:47+5:302023-06-23T21:44:00+5:30

भारतात परण्यापूर्वी पीएम नरेंद्र मोदी इजिप्तमधील 1 हजार वर्षे जुन्या अल हकीम मशिदीला भेट देणार आहेत.

Narendra Modi Egypt Visit: After America, PM Modi will go to the mosque of Egypt; Intimacy with 'Bohra' Muslim community | अमेरिकेनंतर इजिप्तच्या मशिदीत जाणार PM मोदी; 'या' मुस्लिम समुदायाशी जिव्हाळ्याचे संबंध...

अमेरिकेनंतर इजिप्तच्या मशिदीत जाणार PM मोदी; 'या' मुस्लिम समुदायाशी जिव्हाळ्याचे संबंध...

googlenewsNext


Narendra Modi Egypt: अमेरिकेहून भारतात परतण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी इजिप्तच्या दौऱ्यावर जाणार आहेत. राजधानी कैरो येथील 1000 वर्षे जुन्या प्रसिद्ध अल हकीम मशिदीला ते भेट देतील. या मशिदीचा भारतातील मुस्लिम समुदायाशी विशेष संबंध आहे. या मुस्लिम समाजाचे पंतप्रधान मोदींशी जुने आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. हा दाऊदी बोहरा समाज आहे. 

इजिप्त सरकारच्या म्हणण्यानुसार, 11व्या शतकातील या मशिदीच्या दुरुस्तीचे काम गेल्या सहा वर्षांपासून सुरू होते. यामध्ये दाऊदी बोहरा समाजाचा मोठा वाटा आहे. सरकारचे म्हणणे आहे की, या दुरुस्तीचा उद्देश इजिप्तमध्ये असलेल्या इस्लामिक ठिकाणांच्या पर्यटनाला चालना देणे आहे. खुद्द पीएम मोदींनी या समुदायाला देशभक्त आणि शांततेचे समर्थक म्हटले आहे.
  
दाऊदी बोहरा समुदाय कोण आहे?

दाऊदी बोहरा समुदाय इस्लामच्या फातिमीद इस्लामिक तय्याबी स्कूलचे पालन करतो. त्यांचा समृद्ध वारसा इजिप्तमध्ये जन्माला आला, त्यानंतर येमेनमार्गे तो 11व्या शतकात भारतात स्थायिक झाले. 1539 नंतर भारतात दाऊदी बोहरा समुदायाची संख्या वाढू लागली. त्यानंतर त्यांनी आपल्या पंथाची जागा येमेनमधून गुजरातमधील पाटण जिल्ह्यातील सिद्धपूर येथे हलवली. आजही या परिसरात त्यांचे वडिलोपार्जित वाडे आहेत. या समाजातील पुरुष पांढरे कपडे आणि सोनेरी टोप्या घालतात, तर महिला रंगीबेरंगी बुरखे घालण्यासाठी ओळखल्या जातात.

दाऊदी बोहरा समाजात शिया आणि सुन्नी, अशा दोन्ही धर्माचे लोक आहेत. शिया समुदाय मुख्यतः व्यवसाय करतो, तर सुन्नी बोहरा समुदाय प्रामुख्याने शेती करतो. संपूर्ण जगात दाऊदी बोहरा समुदायाची संख्या 10 लाखांच्या जवळपास आहे. त्यापैकी निम्मे म्हणजे 5 लाख फक्त भारतात राहतात. बोहरा हा शब्द गुजराती भाषेतील वोरू शब्दावरुन आलाय, ज्याचा अर्थ व्यापार असा होतो. गुजरात व्यतिरिक्त, हा समाज भारतातील महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात देखील आहे, परंतु त्यांची सर्वात जास्त संख्या गुजरातमधील सुरतमध्ये आहे.

मोदींचा या समाजाशी जुना संबंध 

पंतप्रधान होण्यापूर्वीच नरेंद्र मोदी यांचे दाऊदी बोहरा समाजाशी विशेष संबंध होते. 2011 मध्ये मुख्यमंत्री म्हणून त्यांनी समाजाचे प्रमुख सय्यदना बुरहानुद्दीन यांच्या 100 व्या वाढदिवसाच्या सोहळ्याला हजेरी लावली होती. नंतर 2014 मध्ये त्यांचे निधन झाल्यावरही मोदी त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी मुंबईला गेले होते. त्यानंतर पीएम मोदी आणि बुरहानुद्दीन यांचा मुलगा आणि उत्तराधिकारी सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांच्याशी चांगले संबंध बनले. 2015 मध्ये पंतप्रधान असतानाही त्यांनी सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांची भेट घेतली होती.

हा समाज मोदींचा समर्थक 
मोदींनी मुंबईतील सैफी अकादमीच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटनही केले. त्यांनी आपल्या भाषणात या समाजाला आपल्या कुटुंबाचा एक भाग मानतो, असे सांगितले होते. दाऊदी बोहरा समुदाय नेहमीच पंतप्रधान मोदींच्या पाठीशी उभा राहिला आहे. 2014 नंतर जेव्हाही पंतप्रधान मोदी परदेशात कार्यक्रम करतात, तेव्हा या समाजाचे लोक मोठ्या संख्येने तेथे पोहोचतात. न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डन आणि सिडनी येथील ऑलिम्पिक पार्क अरेना येथे आयोजित कार्यक्रमातही हा समाज मोठ्या संख्येने आला होता. 

Web Title: Narendra Modi Egypt Visit: After America, PM Modi will go to the mosque of Egypt; Intimacy with 'Bohra' Muslim community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.