जेव्हा तोंड उघडतात, तेव्हा एके-47 सारखं खोटं बोलतात - नरेंद्र मोदी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 18:06 IST2018-11-03T18:05:43+5:302018-11-03T18:06:17+5:30

काही नेते मशीन सारखे खोटे बोलतात. जेव्हा तोंड उघडतात, तेव्हा एके-47 सारखे खोटे बोलणे सुरु होते. त्यामुळे तुम्ही विरोधकांच्या खोट्या आरोपांना जनतेसमोर उघडे करा, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना केले. 

narendra modi attacks on opposition in interaction with booth workers mera booth sabse mazboot program | जेव्हा तोंड उघडतात, तेव्हा एके-47 सारखं खोटं बोलतात - नरेंद्र मोदी  

जेव्हा तोंड उघडतात, तेव्हा एके-47 सारखं खोटं बोलतात - नरेंद्र मोदी  

नवी दिल्ली : भाजपाकडूनपंतप्रधाननरेंद्र मोदींसह सर्वच दिग्गज नेते आगामी निवडणुकीसाठी आतापासून कामाला लागले आहेत. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी विरोधकांच्या खोट्या आरोपांना जनतेसमोर आणा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. 

काही नेते मशीन सारखे खोटे बोलतात. जेव्हा तोंड उघडतात, तेव्हा एके-47 सारखे खोटे बोलणे सुरु होते. त्यामुळे तुम्ही विरोधकांच्या खोट्या आरोपांना जनतेसमोर उघडे करा, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना केले. 

दरम्यान, आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणा या पाचही राज्यांत विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. तसेच, 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सुद्धा आतापासूनच राजकीय हालचालींना वेग आला आहे. 
 
Web Title: narendra modi attacks on opposition in interaction with booth workers mera booth sabse mazboot program