शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
5
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
6
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
9
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
10
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
17
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
18
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
19
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
20
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी, अमित शहा, अडवाणींना काँग्रेसचे चौधरी म्हणाले घुसखोर; भाजप सदस्यांची माफीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 05:05 IST

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे ‘घुसखोर’ आहेत, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते अधिर रंजन ...

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे ‘घुसखोर’ आहेत, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते अधिर रंजन चौधरी यांनी केल्यावर सोमवारी लोकसभेत शाब्दिक वादावादी झाली. भाजपच्या सदस्यांनी चौधरी यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केली.वादग्रस्त बनलेले राष्ट्रीय नागरिकत्व रजिस्टर (एनआरसी) विषयावर रविवारी बोलताना चौधरी यांनी वरील वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, ‘मोदी आणि शहा यांची घरे गुजरातेत आहेत; पण ते दिल्लीत राहत असल्यामुळे ते स्थलांतरित आहेत.’ संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या विदेशी जन्माचा उल्लेख करून म्हणाले की, त्यांच्या (चौधरी) स्वत:च्या पक्षाचा नेताच ‘घुसखोर’ आहे आणि ते मात्र त्याच मुद्यावरून इतरांना लक्ष्य करीत आहेत.’प्रश्नोत्तर तासात चौधरी हे पोलाद मंत्रालयाशी संबंधित पुरवणी प्रश्न विचारण्यास उभे ठाकले तेव्हा भाजपच्या सदस्यांनी ‘घुसखोर’ हा शब्द अनेक वेळा उच्चारून त्यांचा उपहास करण्याचा प्रयत्न केला. त्यावर चौधरी यांनी तात्काळ त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.ते म्हणाले, ‘होय, मी घुसखोर आहे. मी वाळवी (टर्माईट) आहे. ‘मोदी हे घुसखोर आहेत. अमित शहा घुसखोर आहेत. लाल कृष्ण अडवाणी घुसखोर आहेत.’ त्यावर पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी प्रत्युत्तर देताना ‘चौधरी यांचे कारस्थान लवकरच उघडे पाडले जाईल’, असे म्हटले. ‘सब खुलेंगी, आप की परिभाषा से देश नही चलेगा’, असे प्रधान म्हणाले.

टॅग्स :Amit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदी