शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

हृदयद्रावक! टोमॅटो विकून शेतकऱ्याने ३० लाख कमावले; लुटीसाठी अज्ञातांनी केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 12:34 IST

Tomato farmer murdered in Annamayya district : 

Tomato Farmer Murder : आंध्र प्रदेशातील अन्नामय्या जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सध्या टोमॅटोला चांगला भाव असल्याने टॉमॅटो उत्पादक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आहे. पण इथे लाखोंचो टोमॅटो विकणाऱ्या शेतकऱ्याची हत्या झाल्याने एकच खळबळ माजली. नरेम राजशेखर रेड्डी (६२) असे हत्या झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून बुधवारी ही घटना घडल्याचे समजते. मंगळवारी रात्री मृत शेतकरी गावात दूध विकण्यासाठी जात असताना त्यांची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हल्लेखोरांनी त्यांना थांबवून हात-पाय बांधून टॉवेलने गळा आवळून त्यांचा जीव घेतला. 

दरम्यान, नरेम ज्या गावात दूध देण्यासाठी गेले होते तिथे आणखी एक शेतकरी दूध विकायला आला होता. त्या शेतकऱ्याच्या पत्नीने संबंधित घटनेची माहिती पोलिसांना दिली. तिने सांगितले की, काही अज्ञात लोक टोमॅटो खरेदीच्या बहाण्याने शेतात आले होते. पती गावी गेल्याचे मी सांगताच ते तिथून निघून गेले.

लाखोंचे टोमॅटो विकणाऱ्या शेतकऱ्याची हत्यालक्षणीय बाब म्हणजे हत्या झालेल्या शेतकऱ्याने नुकतेच कृषी बाजारात टोमॅटो विकून ३० लाख रुपये कमावले आहेत. यामुळेच हत्या केली असल्याचा संशय आहे. शेतकऱ्याकडे एवढे पैसे होते की नाही याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले. पोलीस उपअधीक्षक केसप्पा यांनी सांगितले की, या प्रकरणाच्या तळाशी जाण्यासाठी चार पथके तयार करण्यात आली आहेत.

तसेच तीन-चार लोकांनी मिळून संबंधित शेतकऱ्याची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस अधीक्षक गंगाधर राव यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन पीडित शेतकऱ्याच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. दोन्ही मुली विवाहित असून त्या बंगळुरू येथे राहतात.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशFarmerशेतकरीCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिस