शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उदभवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
3
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
4
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
5
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
6
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
7
पुतीन परतले, पुढे...?
8
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
9
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
10
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
11
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
12
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
13
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
14
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
15
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
16
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
18
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
19
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
20
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

सनातन हिंदू धर्माच्या रक्षणासाठी 'नरसिंग वाराही ब्रिगेड'ची स्थापना; पवन कल्याण यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2024 17:46 IST

पवन कल्याण यांच्या घोषणेला भाजपचा पाठिंबा.

Pawan Kalyan Narasimha Varahi Brigade: प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी सनातन हिंदू धर्माच्या रक्षणासाठी 'नरसिंह वाराही विंग/ब्रिगेड' (Narasimha Varahi Brigade) स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, त्यांचा पक्ष जनसेना आंध्र प्रदेश आणि तेलंगणात सनातन धर्माच्या रक्षणासाठी ही नरसिंह वाराही विंग स्थापन करत आहे. विशेष म्हणजे, त्यांना या कामासाठी भाजपची साथ मिळाली आहे.

'सनातनविरोधी पोस्ट खपवून घेणार नाही'याबाबत घोषणा करताना पवन कल्याण म्हणाले की, "हिंदू मंदिरांना भेटी देताना आणि सनातन धर्माचे पालन करताना काही मूल्ये जपली पाहिजेत. सनातन धर्माशिवाय देश तसाच राहणार नाही, हे आपण समजून घेतले पाहिजे. सनातन हा केवळ देशासाठीच नव्हे, तर जगासाठी मार्गदर्शक प्रकाश आहे."

"सोशल मीडियावर हिंदू धर्म किंवा सनातन धर्माची खिल्ली उडवणारी कोणतीही पोस्ट यापुढे खपवून घेतली जाणार नाही. त्या दिशेने एक पाऊल म्हणून जनसेना पक्षाने सनातन धर्म संरक्षण ग्रुप किंवा नरसिंह वाराही विंगची स्थापना केली आहे. चर्च आणि मशिदीचा आदर केला पाहिजे. पण, सनातन धर्माविरुद्ध बोलून लोकांच्या भावना दुखावल्या तर त्याला शिक्षा होईल. मी एनडीए सरकारच्या वतीने नाही, तर जनसेनेच्या वतीने बोलत आहे. मी सर्व धर्मांचा आदर करतो, पण मला सनातन धर्माचे रक्षण करायचे आहे आणि त्यासाठी मी काम करणार आहे," अशी घोषणा पवन कल्याण यांनी केली.

पवन कल्याण यांना भाजपची साथपवन कल्याण यांच्या घोषणेवर भाजप नेते नलिन कोहली म्हणाले, "लोकांनी मर्यादा ओलांडल्या आहेत, सनातन धर्माविषयी वाटेल त्या गोष्टी बोलल्या जात आहेत. तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री सनातनबद्दल काय म्हणाले, ते सर्वांनी ऐकले. त्यांनी सनातन धर्माची तुलना एका रोगाशी केली. फक्त सनातनलाच टार्गेट का? एखाद्याला सनातन धर्म बळकट करायचा असेल तर त्यात गैर काय?" असे म्हटले. 

टॅग्स :pawan kalyanपवन कल्याणAndhra Pradeshआंध्र प्रदेशHinduहिंदूBJPभाजपा