शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय
2
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये
3
Top Marathi News Live: विजय यांची बहुमत जुळवण्यासाठी धडपड, आणखी एका पक्षाला पाठवले पत्र
4
प. बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
5
Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा...
6
कधीकाळी सचिन तेंडुलकरसोबत टीम इंडियात केले पर्दापण; आज मानसिक आजाराशी लढतोय 'हा' खेळाडू
7
अनिल परब यांची राज्यभर गाजलेल्या दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणातून निर्दोष मुक्तता
8
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
9
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
10
राज्य सरकारचा विभाग शक्तिपीठ महामार्गाची माहिती देत नाही- राजू शेट्टी यांचा आरोप
11
सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाण्याची चर्चा
12
Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र
13
Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!
14
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
15
धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड
16
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
17
"आता पत्नी बाहेर गेली तर काळजी वाटत नाही", ३० वर्षे दिल्लीत राहिलेल्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल
18
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
19
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
20
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
Daily Top 2Weekly Top 5

नांद न्यूज

By admin | Updated: December 25, 2014 22:41 IST

चोरविहिरा जलाशयाचा फायदा काय?

चोरविहिरा जलाशयाचा फायदा काय?
शेतकऱ्यांचा सवाल : वन विभागाच्या आडकाठीमुळे शेतीपर्यंत पाणी पोहोचले नाही
नांद / भगवानपूर : उमरेड वन परिक्षेत्राच्या दक्षिण भागात ४० वर्षांपूर्वी चोरविहिरा क्र. २ जलाशय तयार करण्यात आले. मात्र वन विभागाने आडकाठी आणल्याने त्या जलाशयातून शेतीपर्यंत पाणी पोहोचू शकले नाही. परिणामी या जलाशयाचा फायदा काय, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
गेल्या ४० वर्षांपूर्वी चोरविहिरा जलाशय बांधण्यात आले. या जलाशयाची सिंचन क्षमता १५०० हेक्टरची आहे. जलाशय पूर्णत्वास आल्यानंतर मुख्य कालव्याचे खोदकामाला सुरुवात करण्यात आली. वन विभागाच्या हद्दीतून १००० मीटर लांब अंतरापर्यंत हा कालवा जातो. यापैकी ८०० मीटरचे खोदकाम करण्यात आले. उर्वरित २०० मीटरचे काम शिल्लक असताना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी खोदकाम करण्यास मज्जाव केला. तेव्हापासून ते काम बंद असून २०० मीटरसाठी शेतीला पाणी पोहोचू शकले नाही.
वन विभागाने आडकाठी आणल्यामुळे किमान शेतातील कालव्याचे काम पूर्ण करण्याच्या कामी कंत्राटदार लागला. त्याने शेतातून जाणाऱ्या कालव्याचे काम केले. मात्र २०० मीटरचे खोदकाम होऊन तो कालवा जोडला जात नाही, तोपर्यंत त्या कालव्याचा काहीएक फायदा होऊ शकत नाही. गेल्या ४० वर्षांपूर्वी हे काम करण्यात आले. तेव्हापासून ते बंदस्थितीत असल्याने सध्या ते कालवेसुद्धा जमीनदोस्त झाल्याचे दिसून येते. बऱ्याच ठिकाणी कालवा नेमका कुठे होता, हे कळायला मार्ग नाही.
या जलाशयाच्या काही अंतरावर चोरविहिरा क्र. १ हे जलाशय आहे. त्या जलाशयाची निर्मितीसुद्धा त्याच कालावधीत झाली. त्या जलाशयाचा कालवासुद्धा वन विभागाच्या जागेतून जातो. मात्र त्यास वन विभागाने विरोध केला नाही. त्याचा शेतीसाठी लाभ होत असला तरी त्याची सिंचन क्षमता केवळ ५०० हेक्टर आहे. दुसरीकडे मोठ्या जलाशयाच्या मार्गात आडकाठी आणल्याने १५०० हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचित आहे. या जलाशयाकडे सिंचन विभागाने लक्ष देऊन त्वरित काम पूर्ण करावे, जलाशयाचा फायदा शेतीला होईल यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)