शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

निवडणूक संपताच नमो टीव्हीनं गाशा गुंडाळला; डीटीएचवरुन गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 8:36 PM

नमो टीव्ही अचानक डीटीएचवरुन गायब

मुंबई: लोकसभा निवडणूक संपताच नमो टीव्ही गायब झालं आहे. अचानक ग्राहकांच्या सेट टॉप बॉक्सवर आलेल्या नमो टीव्हीनं तितक्याच अचानकपणे गाशा गुंडाळला आहे. 26 मार्चला लोकसभा निवडणूक सुरू होण्याच्या काही दिवस आधी नमो टीव्ही डीटीएचवर दिसू लागलं होतं. त्याआधी या वाहिनीची कोणतीही जाहिरात दिसली नव्हती. या टीव्हीवर कायम पंतप्रधान नरेंद्र मोदींची भाषणं, मुलाखती आणि कार्यक्रम दाखवले जायचे. अचानक आपल्या डीटीएचवर ही वाहिनी पाहून प्रेक्षकांना धक्का बसला होता. विरोधकांनी नमो टीव्हीवर जोरदार टीका केली होती. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह अनेक नेत्यांनी यावरुन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला लक्ष्य केलं होतं. नियम धाब्यावर बसवून या वाहिनीला परवानगी दिल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. सरकारनं आपला प्रपोगेंडा राबवण्यासाठी ही वाहिनी आणल्याचा आरोपदेखील झाला होता. टाटा स्काय, व्हिडीओकॉन, डिश टीव्हीवर नमो टीव्ही वाहिनी मोफत दाखवली जात होती. वाद झाल्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं निवडणूक आयोगानं वाहिनीला नोटीस बजावली. ही वाहिनी नोंदणीकृत नसल्याचं उत्तर मंत्रालयानं निवडणूक आयोगाला दिलं होतं. वाहिनी नोंदणीकृत नसल्यानं तिच्या प्रेक्षपणासाठी परवानगीची आवश्यकता नाही, असंदेखील मंत्रालयानं उत्तरात नमूद केलं होतं. यामुळे विरोधकांनी आयोग आणि मंत्रालयावर टीकेची झोड उठवली होती. आता मतदान संपताच नमो टीव्ही गायब झाल्यानं केवळ निवडणुकीसाठी ही वाहिनी सुरू करण्यात आली होती, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी