शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

एन. ए. प्रकरणांवरून महापालिकेत खडाजंगी बांधकाम परवाने रखडले : नगररचनाकाराने केली बदलीची मागणी

By admin | Updated: June 2, 2015 00:03 IST

सोलापूर : शहरातील एकही एनए (बिगरशेती परवाने) न झाल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे विकास प्रकल्प रखडले असून, याबाबत मनपा आयुक्तांनी निर्णय घ्यावा, अशी उद्योजकांची मागणी आहे़ यावरून सोमवारी महापालिकेत आयुक्त कार्यालयात खडाजंगी उडाली.

सोलापूर : शहरातील एकही एनए (बिगरशेती परवाने) न झाल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे विकास प्रकल्प रखडले असून, याबाबत मनपा आयुक्तांनी निर्णय घ्यावा, अशी उद्योजकांची मागणी आहे़ यावरून सोमवारी महापालिकेत आयुक्त कार्यालयात खडाजंगी उडाली.
पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यापर्यंत बिल्डरनी हा प्रश्न नेला. त्यावर आयुक्तकाळम-पाटील यांनी ३१ मे पर्यंत ही प्रकरणे निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. पण आता जून उजाडल्यामुळे विकासक नाराज झाले आहेत. मनोहर सपाटे यांनी सोमवारी सायंकाळी आयुक्त काळम-पाटील यांची भेट घेऊन ही प्रकरणे कधी निकाली लावणार असा सवाल केला. त्यावर आयुक्तांनी ओपन स्पेस पाहावा लागेल असे सांगितले. दिलेल्या प्लॅनप्रमाणे नगररचनाकारांनी लेआऊट मंजूर केल्यावर पुन्हा ओपन स्पेस पाहण्याची गरज काय असा सवाल सपाटे यांनी केला. यावर बरीच खडाजंगी उडाली. त्यावर नगररचना विभागाचे सहायक संचालक महेश क्षीरसागर यांनी निवासी उप जिल्हाधिकार्‍यांच्या मदतीने बरीच प्रकरणे निकाली काढण्याची तयारी केल्याचे स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गेल्या दोन वर्षांत एकही एऩ ए़ (बिगरशेती परवाने) दिले नाहीत़ दरम्यान, हे परवाने देण्याचे अधिकार शासनाने महापालिकेला दिले; मात्र जिल्हाधिकार्‍यांकडून ना-हरकत घेण्याची अट घालण्यात आली होती़ त्यामुळे बर्‍याच दिवसांपासून रखडलेले एनओसी देण्यास सुरुवात झाली असून, ५७ पैकी २६ जणांना एनओसी दिले आहेत़ आता महापालिकेकडून त्यांना बिगरशेती परवाने देण्यात येतील़. २२ ऑगस्ट रोजीच्या शासन निर्णयाद्वारे एनए करण्याची प्रक्रिया महापालिकेकडे देण्यात आली आहे़ वर्ग एकच्या म्हणजेच खासगी मालकीच्या शहरातील जागांसाठी महसुली अधिकार्‍यांची ना-हरकत घेणे गरजेचे नाही, तरीही याबाबत आग्रह धरला जात आहे़ त्यासाठी आता डेटा बँक नाही, असे सांगितले जात आहे़ खासगी जमिनीसाठी डेटा बँकेची गरज काय, तो वर्ग दोनच्या जमिनीसाठी डेटा गरजेचा आहे, असे उद्योजक, बांधकाम व्यावसायिक सांगत असले तरी महसुली अधिकारी हे ऐकायला तयार नाहीत. शासनाने काढलेल्या अध्यादेशात बर्‍याच बाबी स्पष्ट न केल्यामुळे एनएची सर्व प्रकरणे थांबली आहेत़ सोलापूरच नव्हे तर राज्यातील सर्व महापालिकांची अशी स्थिती झाली आहे.
इन्फो..
बांधकाम परवान्यावरून वाद
रितसर बाबी पूर्ण करूनही बांधकाम परवाने दिले जात नाहीत अशी तक्रार बिल्डर राजेंद्र शहा यांनी केली आहे. त्यावर नगर अभियंता कार्यालयात लक्ष्मण चलवादी यांच्यासमवेत बैठक झाली. शहा यांनी आक्रमक भूमिका मांडल्यामुळे नगररचना विभागाचे सहायक संचालक महेश क्षीरसागर यांनी आयुक्त काळम-पाटील यांना निवेदनाद्वारे बदलीची मागणी केली आहे. २५00 बांधकाम परवाने प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.