'माझ्या पत्नीचे 4 बॉयफ्रेंड; मलाही मारुन ड्रममध्ये टाकतील', पतीने मुख्यमंत्र्यांकडे मागितली मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 19:08 IST2025-03-29T19:08:11+5:302025-03-29T19:08:32+5:30

उत्तर प्रदेशातील मेरठ हत्याकांडाची सध्या देशभर चर्चा सुरू आहे.

'My wife has 4 boyfriends; ...they will kill me', husband appeals to the Chief Minister for help | 'माझ्या पत्नीचे 4 बॉयफ्रेंड; मलाही मारुन ड्रममध्ये टाकतील', पतीने मुख्यमंत्र्यांकडे मागितली मदत

'माझ्या पत्नीचे 4 बॉयफ्रेंड; मलाही मारुन ड्रममध्ये टाकतील', पतीने मुख्यमंत्र्यांकडे मागितली मदत

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करुन शरीराचे 15 तुकडे केले अन् ड्रममध्ये भरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. या घटनेनंतर आता मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमील एका व्यक्तीला त्याच्या हत्येची भीती सतावत आहे. अमित कुमार सेन नावाच्या तरुणाने आरोप केला आहे की, त्याच्या पत्नीचे अनेक बॉयफ्रेंड आहेत आणि ती त्यापैकी एकासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. अमितने याला विरोध केला असता पत्नीच्या प्रियकराने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली.

पत्नीने घर सोडले, प्रियकरासह राहते
ग्वाल्हेरच्या मेहंदीवाला सय्यद भागात राहणाऱ्या अमित सेनच्या पत्नीचे लग्नानंतरही अनेक बॉयफ्रेंड होते. सध्या ती राहुल बाथम नावाच्या व्यक्तीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असून, तिच्या लहान मुलालाही सोबत घेऊन गेली आहे. अमितचा आरोप आहे की, त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराने मिळून मोठा मुलगा हर्षचा खून केला आहे. तसेच, त्याला आपल्या हत्येची संशयदेखील आहे.

पोलिसांनी ऐकले नाही, मुख्यमंत्र्यांना आवाहन
अमितने अनेकवेळा पोलिसांकडे तक्रार केली, पण कारवाई झाली नाही. नाराज होऊन तो ग्वाल्हेरमधील फूलबाग चौकात मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या पोस्टरखाली धरण्यावर बसला. त्याने मुख्यमंत्र्यांना सुरक्षेसाठी आवाहन केले असून, लवकर कारवाई झाली नाही, तर मेरठच्या ड्रम घटनेप्रमाणे माझीही हत्या होऊ शकते, असा संशय व्यक्त केला आहे.

पोलीस काय म्हणतात?
या प्रकरणी जनकगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी सांगतात की, अमित कोणतीही तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आलेला नाही. त्याने यापूर्वी अर्ज दिला असेल, तर त्यावर कारवाई केली जाईल. तर, अमित सांगतो की, त्याने अनेकवेळा पोलिसांची मदत मागितली, पण कोणतीही सुनावणी झाली नाही.

Web Title: 'My wife has 4 boyfriends; ...they will kill me', husband appeals to the Chief Minister for help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.