शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

"माझा नवरा पाकिस्तानचा हेर नाही, तो तर..."; आयएसआय एजंटना मदत करणाऱ्या शाहजादची पत्नी काय म्हणाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 13:08 IST

उत्तर प्रदेश एटीएसने रविवारी मोठी कारवाई करत मुरादाबाद येथून शहजाद नावाच्या व्यक्तीला आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. ...

उत्तर प्रदेश एटीएसने रविवारी मोठी कारवाई करत मुरादाबाद येथून शहजाद नावाच्या व्यक्तीला आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. आरोपीवर पाकिस्तानसाठी संवेदनशील माहिती गोळा करून पाठवल्याचा संशय आहे. सध्या एटीएसकडून त्याची चौकशी सुरू असून, प्राथमिक तपासात काही महत्त्वाचे तपशील समोर आले आहेत.

शहजादची पत्नी रजिया, जी मूळची रामपूर येथील आहे, तिने पतीवरील सर्व आरोप फेटाळले आहेत. पत्रकारांशी बोलताना रजियाने म्हटले की, "माझा नवरा पाकिस्तानातून सूट आणि कापड आयात करून विकायचा. व्यवसाय थांबल्यावर तो फळांची गाडी लावायचा. त्याच्यावर केलेले सर्व आरोप खोटे आहेत. त्याच्यावर अत्याचार केला जात आहे." तिने म्हटले की, शहजाद वर्षातून एक-दोन वेळा पाकिस्तानातील लाहोरला जायचा, तेथून कपडे आणून भारतात विक्री करायचा. त्याचा आयएसआयशी कोणताही संबंध असल्याचे तिने नाकारले आहे.

शहजादचे वारंवार पाकिस्तान दौरे एटीएसच्या रडारवरउत्तर प्रदेश एटीएसच्या हवाल्यानुसार, शहजादने अनेक वेळा भारत-पाकिस्तान सीमेवर प्रवास केला आहे, आणि हे दौरे संशयास्पद मानले जात आहेत. सध्या त्याच्याशी संबंधित संपूर्ण नेटवर्कचा तपास सुरू असून, त्याच्या संपर्कातील इतर व्यक्तींवरही नजर ठेवली जात आहे.

शहजाद एकटाच पाकिस्तानला जायचा!शहजाद एकटाच पाकिस्तानला जायचा, त्याच्या सोबत कुणीही नव्हते, असे रजियाने सांगितले. त्याने कधीही कोणालाही सोबत नेले नाही. ती म्हणाली की,"माझ्या नवऱ्याचा आयएसआयशी काहीही संबंध नाही. तो फक्त आपली उपजीविका चालवत होता."

एटीएसकडून सखोल चौकशीएटीएसने शहजादविरुद्ध गोळा केलेल्या पुराव्यांवर आधारित चौकशी सुरू केली आहे. तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, अजून काही महत्त्वाचे खुलासे होणे बाकी आहेत, आणि त्याच्या आर्थिक व्यवहारांची तसेच पाकिस्तानातील संपर्कांची चौकशी केली जात आहे.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानISIआयएसआयTerrorismदहशतवादTerror Attackदहशतवादी हल्ला