बागमती नदीत शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बोट उलटली, १८ जण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 12:45 PM2023-09-14T12:45:20+5:302023-09-14T12:46:07+5:30

एनडीआरएफच्या टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. 

Muzaffarpur boat capsizes death toll children missing Gaigghat Bagmati River, Bihar | बागमती नदीत शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बोट उलटली, १८ जण बेपत्ता

बागमती नदीत शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बोट उलटली, १८ जण बेपत्ता

googlenewsNext

बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील मुलांना शाळेत घेऊन जाणारी बोट उलटली. या घटनेनंतर  १८ मुले बेपत्ता झाली आहेत. या बोटीत ३४ मुले होती. एनडीआरएफच्या टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गायघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत बागमती नदीत घडली. भटगामा मधुरपट्टी येथील पीपळ घाटातून मुले शाळेत जात असताना ही दुर्घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, या घटनेनंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रशासनाने बचाव कार्य सुरू आहे. अनेक मुलांना बाहेर काढले आहे, पण अजूनही काही मुले बेपत्ता आहेत. 

घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला आहे. घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी जमली आहे. नदीत पाण्याचा जोरदार प्रवाह असल्याने बचाव कार्य करताना अडचणी येत आहेत. याशिवाय, या घटनेनंतर स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. वर्षानुवर्षे नदीवर पूल बांधण्याची मागणी करत आहोत, मात्र त्यांची मागणी मान्य न झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या बोटीत लहान मुलांसह काही महिलाही होत्या, असे सांगण्यात येत आहे.

Web Title: Muzaffarpur boat capsizes death toll children missing Gaigghat Bagmati River, Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.