प्यार किया तो डरना क्या! 28 वर्षांची शिक्षिका ६० वर्षीय संचालकाच्या प्रेमात; नेपाळमध्ये केलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 10:28 IST2026-02-23T10:27:25+5:302026-02-23T10:28:14+5:30

एका खासगी शाळेचे ६० वर्षीय संचालक राकेश शाह यांनी आपल्याच शाळेतील २८ वर्षीय शिक्षिका शाइस्ता परवीन हिच्याशी पळून जाऊन लग्न केलं आहे.

muzaffarpur 28 year old shaista secretly marrie in temple 32 years older rakesh | प्यार किया तो डरना क्या! 28 वर्षांची शिक्षिका ६० वर्षीय संचालकाच्या प्रेमात; नेपाळमध्ये केलं लग्न

प्यार किया तो डरना क्या! 28 वर्षांची शिक्षिका ६० वर्षीय संचालकाच्या प्रेमात; नेपाळमध्ये केलं लग्न

बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातील औराई भागातून एक अशी लव्हस्टोरी समोर आली आहे, ज्याने वय, धर्म आणि समाजाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. एका खासगी शाळेचे ६० वर्षीय संचालक राकेश शाह यांनी आपल्याच शाळेतील २८ वर्षीय शिक्षिका शाइस्ता परवीन हिच्याशी पळून जाऊन लग्न केलं आहे. थेट नेपाळमध्ये जाऊन त्यांनी लग्न केलं. आता या दोघांच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. तर दुसरीकडे शाइस्ताच्या कुटुंबीयांनी राकेश यांच्यावर गंभीर आरोप करत एफआयआर दाखल केली आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

मिळालेल्या माहितीनुसार, राकेश शाह औराईमध्ये एक खासगी शाळा चालवतात. शाइस्ता त्याच शाळेत शिक्षिका होती. एकत्र काम करत असताना दोघांमध्ये जवळीक वाढली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. १८ फेब्रुवारी रोजी दोघेही अचानक बेपत्ता झाले. दोघांनी सीमा ओलांडून नेपाळला जाऊन एका मंदिरात देवासमोर एकमेकांना हार घातले.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये शाइस्ता परवीन खूप आनंदी दिसत आहे. तिने स्पष्टपणे सांगितलं आहे की, तिने स्वतःच्या इच्छेने लग्न केलं असून ती आपल्या नवीन आयुष्याबद्दल समाधानी आहे. आपल्या पतीच्या कुटुंबाला त्रास देऊ नये, असं आवाहनही तिने केलं आहे. शाइस्ताच्या म्हणण्यानुसार, तिचं कोणीही अपहरण केलेले नाही.

हे प्रकरण दोन वेगवेगळ्या समुदायांशी संबंधित असल्याने परिसरात तणावाचं वातावरण आहे. सध्या शाळा संचालकाचे घर आणि शाळेला टाळं लावलेलं आहे. औराईचे पोलीस निरीक्षक राजा सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत असून व्हायरल व्हिडिओच्या सत्यतेची पडताळणी केली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गावात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Web Title : प्यार किया तो डरना क्या! 28 की शिक्षिका ने 60 के डायरेक्टर से की शादी

Web Summary : बिहार में एक 28 वर्षीय शिक्षिका ने 60 वर्षीय स्कूल डायरेक्टर से नेपाल में शादी कर ली, जिससे विवाद हो गया। शिक्षिका का कहना है कि यह उसकी पसंद थी, लेकिन उसके परिवार ने शिकायत दर्ज कराई है। पुलिस जांच कर रही है और गाँव में तनाव है।

Web Title : Defying Norms: Teacher, 28, Marries School Director, 60, in Nepal

Web Summary : A 28-year-old teacher and a 60-year-old school director from Bihar eloped to Nepal and married, sparking controversy. The teacher claims it was her choice, but her family filed a complaint. Police are investigating amid community tension and verifying viral videos.