Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 14:29 IST2025-11-02T14:28:55+5:302025-11-02T14:29:20+5:30
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे.

Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शाळेच्या व्हॅनने धडक दिल्याने अडीच वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. बुढाना पोलीस स्टेशन हद्दीतील उमरपूर गावात ही धक्कादायक घटना घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ग्रीन पब्लिक स्कूलची व्हॅन नेहमीप्रमाणे लहान मुलांना घेण्यासाठी गावात आली तेव्हा हा दुर्दैवी अपघात झाला. याच दरम्यान रस्त्यावर खेळणारा अडीच वर्षांचा केशव अचानक व्हॅनसमोर आला, जे चालकाच्या लक्षात आलं नाही. स्कूल व्हॅनने चिरडल्याने केशव गंभीर जखमी झाला. त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
#Muzaffarnagar में दिलदहला देने वाली वारदात
— News1India (@News1IndiaTweet) November 1, 2025
पलभर में मासूम की हुई मौत,वारदात CCTV में कैद
ढाई साल का मासूम बच्चा वैन के नीचे कुचला गया
खेलते हुआ मासूम अचानक स्कूल वैन के टायर के नीचे आ गया
चालक की लापरवाही से मासूम की कुछ ही सेकंडों में गई जान
पुलिस ने आरोपी स्कूल वैन चालक… pic.twitter.com/EFKmcxCtFE
घटनेनंतर, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून स्कूल व्हॅन जप्त केली आणि चालकाला अटक केली. पोस्टमॉर्टेमनंतर संध्याकाळी लहान मुलाचा मृतदेह घरी पोहोचला तेव्हा कुटुंबाला मोठा धक्का बसला.
घटनेची माहिती देताना, बुढानी पोलीस आयुक्त गजेंद्र पाल सिंह यांनी सांगितलं की, बुढाना पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या उमरपूर गावातील ग्रीन पब्लिक स्कूलची एक स्कूल व्हॅन मुलांना घेण्यासाठी गेली होती. अडीच वर्षांचा मुलगा व्हॅनने धडकून मृत्युमुखी पडला. व्हॅन चालकाला अटक करण्यात आली आहे आणि पुढील तपास सुरू आहे.