शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

हिंदुराष्ट्रासंदर्भात मुस्लीम काउन्सिलला हवं RSS कडून शंकानिरसन

By admin | Updated: February 17, 2015 17:59 IST

भारत हे हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी संघ परीवाराने कार्यक्रम आखला असून त्या संदर्भात सुन्नी मुस्लीम काऊंसिलतर्फे संघाला सहा प्रश्न विचारण्यात आले आहेत.

ऑनलाइन लोकमत,
नवी दिल्ली, दि. १७ - भारत हे हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी संघ परीवाराने कार्यक्रम आखला असून त्या संदर्भात सुन्नी मुस्लीम काऊंसिलतर्फे संघाला सहा प्रश्न विचारण्यात आले आहेत. या प्रश्नांची उत्तरे मुस्लीम नेत्यांचा सहभाग असलेल्या जाहीर कार्यक्रमात देऊ असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश यांनी मुस्लीम संघटनांना सांगितल्याचे वृत्त आहे.
सुन्नी उलेमा काऊंसिलचे मुख्य सचिव हाजी मोहम्मद सलीस यांनी संघाचे प्रचारक इंद्रेश यांची भेट घेत त्यांना विचारलेल्या सहा प्रश्नांची उत्तरं देण्यास इंद्रेश यांनी टाळले असल्याचे सलीस यांनी सांगितले.  भारत हिंदू राष्ट्र करणार का, भारत जर हिंदू राष्ट्र करणार असाल तर त्याकरता काही प्रयोजन केले आहे का, जर भारत हिंदू राष्ट्र होणार असेल तर त्याकरता हिंदू धर्माचे नियम असणार आहेत की संघ नवीन नियमावली तयार करणार आहे असे प्रश्न सलीस यांनी संघाचे प्रचारक इंद्रेश यांना विचारले. सलीस यांनी असे सांगितले की, इंद्रेश यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे टाळले असून सार्वजनिकरित्या आम्ही या प्रश्नांची उत्तरे देऊ असे सांगितले आहे. 
जर इंद्रेशजी ९० मिनिटांच्या बंद खोलीमध्ये उत्तर देण्यास असमर्थ असतील तर ते समुहापुढे काय उत्तर देणार, मुस्लीम जनतेकडून ही मंडळी काय अपेक्षा करते, ज्यावेळी देशाची फाळणी झाली त्यावेळी आमच्या पुर्वजांनी जिना आणि पाकिस्तान दोघांना नकारत भारत आणि गांधींचा मार्ग स्विकारला, धर्म ही प्रत्येकाची खासगी बाब आहे. आमचे प्रतिनिधित्व औवेसीही करू शकत नाहीत. जी व्यक्ती दुस-यांच्या धर्माबद्दल गरळ ओकते ती मुस्लीम धर्माचे प्रतिनिधीत्व करू शकत नाही, तसेच मुसलमान होण्याकरता आम्ही कोणावरही बळजबरी करत नाही. त्याचप्रमाणे मुस्लीम राहण्यास आम्ही कोणावरही दाबाव आणत नाही, तसा नियम आमच्या धर्मात नाही असेही सलीस यांनी सांगितले. सलीस यांनी संघासोबतच्या भेटीकरता आलम रजा नुरी यांना बोलवले असता त्यांनी इंद्रेश यांची यापूर्वी भेट घेतली असून त्यांना भेटण्याची इच्छा नसल्याचे सांगितले. नुरी यांनी त्यांचे मुद्दे मोहन भागवत यांच्या समोर मांडणार असल्याचे सांगितले.