प्रेग्नंट आहे मुस्कान? कारागृहातच तपासण्यासाठी येणार गायनॅकॉलॉजिस्ट; ...तर लवकरच होणार प्रेग्नंसी टेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 15:35 IST2025-04-07T15:34:35+5:302025-04-07T15:35:18+5:30

मिळालेल्य माहितीनुसार, मुस्कानची तपासणी करण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार तिची पेग्नंसी टेस्ट करण्यासाठी. मेरठ कारागृह प्रशासनाने यासंदर्भात मेरठच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना  (CMO) पत्र पाटवले आहे. या पत्रात गायनॅकॅलॉजिस्टला कारागृहात पाठवण्याची मागणी करण्यात आली आहे...

muskan rastogi pregnant in jail A gynecologist will come to check her in jail | प्रेग्नंट आहे मुस्कान? कारागृहातच तपासण्यासाठी येणार गायनॅकॉलॉजिस्ट; ...तर लवकरच होणार प्रेग्नंसी टेस्ट

प्रेग्नंट आहे मुस्कान? कारागृहातच तपासण्यासाठी येणार गायनॅकॉलॉजिस्ट; ...तर लवकरच होणार प्रेग्नंसी टेस्ट

उत्तर प्रदेशातील मेरठ सौरभ हत्याकांड प्रकरणातील आरोपी मुस्कान रस्तोगी सध्या कारागृहात बंद आहे. तीच्या संदर्भात आता एक नवी माहिती समोर आली आहे. मुस्कान गर्भवती असू शकते, अशी शंका व्यक्त केली जात आहे. कारागृह प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून,तिच्या प्रेगनेंसी टेस्टची तयारीही कत आहे.

मिळालेल्य माहितीनुसार, मुस्कानची तपासणी करण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार तिची पेग्नंसी टेस्ट करण्यासाठी. मेरठ कारागृह प्रशासनाने यासंदर्भात मेरठच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना  (CMO) पत्र पाटवले आहे. या पत्रात गायनॅकॅलॉजिस्टला कारागृहात पाठवण्याची मागणी करण्यात आली आहे. 

यानंतर, जिल्हा रुग्णालयातून एका महिला डॉक्टरला लवकरच कारागृहात पाठवले जाणा आहे. संबंधित डॉक्टर मुस्कानची आरोग्य तपासणी करतील आणि प्रेग्नंसीसंदर्भात काही लक्षणे दिसून आल्यास तिची प्रेग्नंसी टेस्ट केली जाईल. जेल प्रशासनानुसार, सध्या मुस्कानची प्रकृती बरी आहे आणि तिला कुठल्याही प्रकारची गंभीर सम्या नाही.

कारागृहात मुस्कानची प्रकृती खालावल्या दावा नुकताच काही माध्यमांतील वृत्तांमध्ये करण्यात आला होता. मात्र, मेरठ कारागृहाचे वरिष्ठ कारागृह अधीक्षक वीरेश राज शर्मा यांनी हे फेटाळले असून मुस्कान केवळ ठणठणीतच नाही, तर नशेची लक्षणेही आता पूर्णपणे गेली आहेत.

विरेशे राज शर्मा म्हणाले, खरे तर, एखाद्या महिलेला जेव्हा कारागृहात ठेवले जाते, तेव्हा तिच्या आरोग्याची नियमितपणे तपासणी होत असते. विशेषतः जर एखादी महिला आधीच गर्भवती असेल अथवा अशी कोणतीही शक्यता असल्यास तुरुंग प्रशासनाचे तिच्यावर नियमित लक्ष असते.

वीरेश राज शर्मा पुढे म्हणाले, ही एक नियमित प्रक्रिया आहे. महिला बंदिवानांची संख्या जेव्हा वाढते, तेव्हा त्यांची सामूहिक आरोग्य तपासणी केली जाते. मुस्कान प्रकरणातही हेच होत आहे. सीएमओंना पत्र पाठवण्यात आले आहे. त्यांनी पाठवलेल्या महिला डॉक्टरला आवश्यक वाटल्यास मुस्कानची प्रेग्नंसी टेस्ट केली जाईल. 


 

Web Title: muskan rastogi pregnant in jail A gynecologist will come to check her in jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.