शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुण्यातले पर्यटक काश्मीरच्या महापुरात अडकले

By admin | Updated: September 10, 2014 03:37 IST

जम्मू-काश्मीरमधील महापुराचा फटका अनेक पर्यटकांनाही बसला असून, यात मुंबई-पुण्यातील पर्यटकांचाही समावेश आहे.

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील महापुराचा फटका अनेक पर्यटकांनाही बसला असून, यात मुंबई-पुण्यातील पर्यटकांचाही समावेश आहे. मुंबई-पुण्यातील नामवंत टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनीमार्फत जम्मू-काश्मीरमध्ये गेलेल्या १६ जणांचा संपर्कच तुटला आहे. टूर कंपनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्रातील असे बरेच पर्यटक काश्मिरात अडकल्याची भीती आहे. जम्मू-काश्मीरच्या महापुरात आतापर्यंत १५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण बेघर झाले आहेत. आतापर्यंत बचाव पथकाने ४५ हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. तेथील रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत आणि दूरसंचार यंत्रणाही पूर्ण कोलमडली आहे. मुंबई-पुण्यातून केसरी टूर्सतर्फे प्रत्येकी १६ जणांचे असे चार ग्रुप जम्मू-काश्मीरमध्ये गेले होते. महापुरामुळे हे पर्यटक तेथे अडकले. यातील दोन ग्रुपना सुखरूपपणे बाहेर काढून मुंबईसाठी रवाना करण्यात आले. १६ जणांचा एक ग्रुप लेहपर्यंत आला असून, त्यांच्याशी केसरीकडून संपर्क साधण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आणखी एक १६ जणांचा ग्रुप श्रीनगरमध्ये अडकल्याचे केसरी टूर्सचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश पाटील यांनी सांगितले. २४ तासांपूर्वी त्यांच्याशी संपर्क झाला होता. मात्र आता हा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. स्थानिक हॉटेल, टूर आॅपरेटरमार्फत प्रयत्न सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले.