भारतात खटला सुरू झाल्यानं मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणाचं टेन्शन वाढलं...! वकिलाला विचारला हा एक प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 15:03 IST2025-04-13T15:01:56+5:302025-04-13T15:03:12+5:30

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राणा ज्या लोकांना भेटला त्या लोकांसंदर्भातही त्याची चौकशी केली जाणार आहे...

Mumbai attack mastermind Tahawwur Rana's tension increased as trial begins in India asked lawyer how long will this case go | भारतात खटला सुरू झाल्यानं मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणाचं टेन्शन वाढलं...! वकिलाला विचारला हा एक प्रश्न

भारतात खटला सुरू झाल्यानं मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणाचं टेन्शन वाढलं...! वकिलाला विचारला हा एक प्रश्न


अमेरिकेतून भारतात आणलेला मबई २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधार तहव्वुर हुसेन राणा सध्या १८ दिवसांच्या एनआयए कोठडीत आहे. त्याच्या विरोधात भारतात खटला सुरू झाल्याने तो टेन्शनमध्ये दिसत आहे. दरम्यान त्याने त्याच्या वकिलाला या खटल्यासंदर्भात एक प्रश्न विचारला आहे. एबीपी न्यूजने सूत्रांच्या हवाल्याने दिल्या माहितीनुसार, पटियाला हाऊस कोर्टात हजर होताना तहव्वुर राणाने त्यांच्या वकिलाला, "हा खटला एका वर्षात संपेल का?" असा प्रश्न केला होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तहव्वुर राणा भारतातील ट्रायलमुळे टेन्शमध्ये आला असून या प्रक्रियेसंदर्भात प्रश्न विचारत आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर, राणाने न्यायालयाकडे कारागृहात कुराणाची प्रत मिळावी, अशी मागणी केली. त्याची ही मागणी मान्य करत न्यायालयाने NIA ला राणासाठी कुराण उपलब्ध करून देण्याचा आदेश दिला. याशिवाय, पटियाला हाऊस कोर्टाच्या NIA विशेष न्यायालयाने राणाला त्याच्या वकिलांना भेटण्याची परवानगीही दिली. आता राणाचे वकील सोमवारी NIA कार्यालयात त्याची भेट घेतील.

एनआयएचा न्यायालयात मोठा दावा -
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, तपास यंत्रणेने तपासादरम्यान गोळा केलेल्या विविध पुराव्यांच्या आधारे राणाची चौकशी केली जात आहे. यात त्याच्या आणि डेव्हिड कोलमन हेडली उर्फ ​​दाऊद गिलानीच्या फोन कॉलचीही चौकशी केली जात आहे. हेडली सध्या अमेरिकेतील कारागृहात आहे. दरम्यान, राणाला न्यायालयासमोर हजर करताना, त्याने भारतीय अनेक शहरांना लक्ष्य करण्यासाठी २६/११ च्या मुंबई हल्ल्यासारखा दहशतवादी कट रचला होता, असा दावाही केला आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राणा ज्या लोकांना भेटला त्या लोकांसंदर्भातही त्याची चौकशी केली जाणार आहे.

 

Web Title: Mumbai attack mastermind Tahawwur Rana's tension increased as trial begins in India asked lawyer how long will this case go

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.