अनंत-राधिकाच्या लग्नासाठी 'या' लोकांना निमंत्रण; परदेशी पाहुण्यांसाठी खाजगी विमानाची व्यवस्था
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 17:23 IST2024-07-10T17:22:17+5:302024-07-10T17:23:34+5:30
Anant-Radhika Wedding Guest List : या शाही सोहळ्यासाठी देशभरातील राजकीय नेत्यांसह बॉलिवूड, उद्योग अन् क्रीडा क्षेत्रातील दिग्गज येणार आहेत.

अनंत-राधिकाच्या लग्नासाठी 'या' लोकांना निमंत्रण; परदेशी पाहुण्यांसाठी खाजगी विमानाची व्यवस्था
Anant-Radhika Wedding Guest List : अनंत अंबानी आणि राधिका (Anant-Radhika Wedding) मर्चं येत्या 12 जुलै रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. सध्या प्री-वेडिंग फंशन सुरू आहे, ज्यात अनेक सेलिब्रिटी हजेरी लावत आहेत. आता या शाही विवाह सोहळ्यासाठी आमंत्रित केलेल्या पाहुण्यांची यादी समोर आली आहे. मुंकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी आपल्या मुलाच्या लग्नासाठीबॉलिवूडपासून ते राजकीय नेते आणि उद्योग क्षेत्रासह खेळ जगतातील दिग्गजांना निमंत्रण पाठवले आहे.
परदेशी पाहुण्यांमध्ये मोठ्या नावांचा समावेश
अनंत-राधिकाच्या लग्नासाठी महाराष्ट्रासह देशभरातील अनेक नेते, बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठे सेलिब्रिटी, उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक खेळाडूंसह अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी हजारे लावणार आहेत. दिग्गज फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम आणि त्यांची पत्नी व्हिक्टोरिया बेकहॅम, हेदेखील अंबानींच्या परदेशी पाहुण्यांच्या यादीत आहेत. याशिवाय, कॅनेडियन रॅपर आणि गायक ड्रेक, अमेरिकन गायिका लाना डेल रे आणि ॲडेल यांचाही समावेश आहे.
या बॉलिवूड दिग्गजांना निमंत्रण
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंबानींच्या गेस्ट लिस्टमध्ये अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार, आमिर खान, रणबीर कपूर, आलिया भट्ट, अर्जुन कपूर, जान्हवी कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी, शाहिद कपूर, विकी कौशल यांच्यासह बॉलिवूडमधील जवळपास सर्वच सेलिब्रिटी आहेत.
येत्या 12 जुलै रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा विवाह सोहळा पार पडणार असून, या भव्य सोहळ्याचे क्षण टिपण्यासाठी अमेरिकेतील फोटोग्राफर्सची टीम बोलवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मुकेश अंबानी यांनी लग्नासाठी येणाऱ्या परदेशी पाहुण्यांसाठी खासगी विमानाची व्यवस्था केली आहे. तसेच, या लग्नासाठी भारतीय ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे.