शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
4
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
5
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
6
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
7
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
8
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
9
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
10
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
11
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
12
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
13
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
14
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
15
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
16
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
17
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

फ्लुरॉसिसच्या संकटावर खासदारांचे मौन

By admin | Updated: December 20, 2014 02:41 IST

महाराष्ट्रातील १९ जिल्हे फ्लुरॉसिसच्या संकटाशी सामना करीत असताना आणि त्यातील १२ जिल्ह्यांनी धोक्याची पातळी गाठली असूनही

रघुनाथ पांडे, नवी दिल्लीमहाराष्ट्रातील १९ जिल्हे फ्लुरॉसिसच्या संकटाशी सामना करीत असताना आणि त्यातील १२ जिल्ह्यांनी धोक्याची पातळी गाठली असूनही या विषयावरील चर्चेत महाराष्ट्रातील खासदारांनी शुक्रवारी लोकसभेत चिंताजनक मौन बाळगले. विशेष म्हणजे हा विषय शुक्रवारी लोकसभा सभागृहात पहिल्या क्रमांकाचा होता. राजस्थान, आंध्रच्या खासदारांनी फ्लुरॉसिस आजरांवरून केंद्र सरकारला धारेवर धरले, पण राज्यातील बरेच खासदार सभागृहात असूनही त्यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले. महाराष्ट्रात ‘स्केलेटल’ व ‘डेंटल’ अशा दोन्ही फ्लुरॉसिसने नागरिक त्रस्त आहेत. संपूर्ण मराठवाडा, विदर्भातील सात जिल्ह्यांमध्ये ही समस्या उग्र आहे. नांदेड, हिंगोली, यवतमाळमध्ये कमालीचा उदे्रक आहे. माहूरजवळचे सावरखेड या गावात ७० टक्के गावकरी दाताच्या फ्लुरॉसिससने ग्रस्त आहेत. पिण्याच्या पाण्यातील फ्लोराइडचे प्रमाण तपासण्याची यंत्रणा उपलब्ध नसल्याने हा प्रकार वाढतो आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय फ्लुरॉसिस नियंत्रण कार्यक्रम सुरू केला, पण त्याला पुरेसा निधी नसल्याने फक्त लोकांचे प्रबोधन होते. विशेष म्हणजे गेल्या वर्षी नांदेड येथून ‘लोकमत‘ने हा विषय मांडल्यावर केंद्र सरकारने राज्यातील दोन जिल्ह्यांऐवजी १२ जिल्ह्यांत राष्ट्रीय फ्ल्युरॉसिस नियंत्रण कार्यक्रम सुरू केला होता. देशात फ्लुरॉसिस बळावत असून, त्याला पायबंद घालण्यासाठी केंद्र सरकार कोणते उपाय योजत आहे, हा प्रश्न राजस्थान, आंध्रच्या खासदारांकडून विचारण्यात आला. आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी उत्तर दिले. राज्य व केंद्र सरकारने ठोस आर्थिक नियोजन करून हा या विषयाचा निपटारा केला पाहिजे, अशी कळकळ त्यांनी बोलून दाखविली. मागील तीन वर्षांचे आकडे त्यांनी दिले. सरकारने चिंता व्यक्त केली. अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनीही सरकारने तोडगा काढलाच पाहिजे, अशी सूचना सरकारला केली. विशेष म्हणजे या वेळी सभागृहात उपस्थित असलेल्या महाराष्ट्रीतील एकाही खासदाराने या विषयात जराही रुची दाखविली नाही. अध्यक्षांनी परवानगी देऊन देखील महाराष्ट्रासाठी हा विषय गंभीर नाही, असे वाटून कोणीच दखल घेतली नाही. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील डॉक्टर असलेले दोन खासदार देखील त्या वेळी उपस्थित होते. राजस्थानचे भाजपा सदस्य डॉ. मनोज राजोरिया यांनी मुद्दा पकडला आणि आरोग्यमंत्री नड्डा यांनी अध्यक्षांच्या परवानगीने कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा नड्डा यांनी राजस्थानसाठी वेगळी योजना राज्य सरकारला सोबत घेऊन केंद्र सुरू करेल, असे सांगावे लागले.