CoronaVirus: उत्तर प्रदेशमधील आरोग्य अधिकारी फोनही उचलत नाहीत; केंद्रीय मंत्र्याचे योगींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 07:16 PM2021-05-09T19:16:34+5:302021-05-09T19:17:41+5:30

CoronaVirus: एका केंद्रीय मंत्र्यांनी उत्तर प्रदेशमधील आरोग्य सेवेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना थेट पत्र लिहिले आहे.

mp santosh gangwar wrote letter to cm yogi adityanath over health system in uttar pradesh | CoronaVirus: उत्तर प्रदेशमधील आरोग्य अधिकारी फोनही उचलत नाहीत; केंद्रीय मंत्र्याचे योगींना पत्र

CoronaVirus: उत्तर प्रदेशमधील आरोग्य अधिकारी फोनही उचलत नाहीत; केंद्रीय मंत्र्याचे योगींना पत्र

Next

लखनऊ: संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशमध्येही कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. उत्तर प्रदेशमध्ये संसाधने मुबलक प्रमाणात असून, कोरोना नियंत्रणासाठी अनेकविध उपाययोजना केल्याचे योगी सरकार सांगत असले, तरी उत्तर प्रदेशातून केंद्रात मंत्री झालेल्या एका नेत्याने उत्तर प्रदेशमधील आरोग्य सेवेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना थेट पत्र लिहिले आहे. (mp santosh gangwar wrote letter to cm yogi adityanath over health system in uttar pradesh)

उत्तर प्रदेशमधील बरेली येथून खासदार असलेले केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून आरोग्य व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली आहे. बरेली येथील आरोग्य अधिकारी साधा फोनही उचलत नाहीत, अशी खंत गंगवार यांनी या पत्रात व्यक्त केली आहे. कोरोनाची स्थिती बिकट आहे. रेफर करण्यात आलेल्या रुग्णांनाही सरकारी रुग्णालयात बेड उपलब्ध होत नाही. त्यांना परत पाठवले जाते. यामुळे अनेक रुग्णांची प्रकृती खालावत आहे. रुग्णांना भरती करून उपचार करण्यात यावेत, असे गंगवार यांनी योगी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. 

“उपाययोजनेपेक्षा ठाकरे सरकारचं पब्लिसिटी स्टंट करण्यावर जास्त लक्ष”

बाजारमूल्यांपेक्षा अधिक किमतीने उपकरणे

कोरोना संकटाच्या काळात आवश्यक असलेली अनेक उपकरणे बाजार भावापेक्षा दीड पट अधिक किमतीने विकली जात आहेत. सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच किमती निर्धारित केल्या पाहिजेत. याशिवाय कोरोना रुग्णालयात चांगल्या सुविधा देण्यात याव्यात, अशी मागणी गंगवार यांनी योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे. 

दिलासा! २५ राज्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांना केंद्राकडून ८,९२३ कोटींचा निधी वितरीत

ऑक्सिजनची कमतरता

उत्तर प्रदेशातील बरेलीसह अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये शक्य तितक्या लवकर ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात यावा. आयुषमान भारताशी संलग्न असलेल्या रुग्णालयांमध्ये कोरोना लसीकरण तातडीने सुरू करण्यात यावे, अशा काही सूचनाही या पत्रात देण्यात आल्या आहेत. 

“राज्याला पुरेशा लसी कशा मिळतील, यासाठी एखादं पत्र केंद्राला जरुर लिहावं”

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशात एका दिवसात ४ लाख ३ हजार ७३८ नागरिक करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. काहीसा दिलासादायक बाब म्हणजे याच कालावधीत देशभरात ३ लाख ८६ हजार ४४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. तर देशात सलग चौथ्या दिवशी चार हजारांहून अधिक मृत्यूची नोंद झाली आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: mp santosh gangwar wrote letter to cm yogi adityanath over health system in uttar pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app