Video: खासदार Jaya Bachchan संतापल्या; जगदीप धनखड यांना दाखवलं बोटं, कारण काय..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 16:56 IST2023-02-12T16:55:41+5:302023-02-12T16:56:15+5:30
जया बच्चन रागात सभापती जगदीप धनखड यांच्याकडे बोट दाखवून काहीतरी बोलल्या.

Video: खासदार Jaya Bachchan संतापल्या; जगदीप धनखड यांना दाखवलं बोटं, कारण काय..?
Jaya Bachchan : समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांना पुन्हा एकदा त्यांच्या वागणुकीमुळे आणि रागामुळे सोशल मीडिया युजर्सकडून ट्रोल केले जात आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये जया बच्चन राज्यसभेच्या कामकाजादरम्यान सभापती जगदीप धनखड यांच्याकडे बोट दाखवून काहीतरी बोलताना दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जया बच्चन जगदीप धनखड यांच्याकडे बोट दाखवताना दिसत आहेत. यासोबतच जया बच्चन त्यांच्या एक्सप्रेशन्सकडे लक्ष दिल्यानंतर त्या खूप संतापलेल्या दिसत होत्या. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर असंसदीय कृत्याबद्दल टीका होत आहे.
दरम्यान, सभागृहात गोंधळ घालणे आणि कामकाजाचे रेकॉर्डिंग केल्याच्या आरोपावरुन काँग्रेस खासदार रजनी पटेल यांना चालू अधिवेशनाच्या उर्वरित दिवसांसाठी निलंबित करण्यात आले. या प्रकरणावर समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी विरोध करत काँग्रेस खासदाराला पाठिंबा दिला. रजनी यांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही, असे त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी जगदीप धनखड यांना बोट दाखवले.
जैसी पार्टी वैसे ही संस्कार... जया बच्चन जी कम से कम आप पद की तो गरिमा रख लेती.... pic.twitter.com/0kMlVtof2n
— Anuja Kapur (@anujakapurindia) February 12, 2023
भाजपची टीका
जया बच्चन यांच्यावर आता सोशल मीडिया यूजर्ससह सत्ताधारी पक्ष भाजपचे नेते जोरदार टीका करत आहेत. छत्तीसगडच्या बिलासपूर लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार आणि पक्षाच्या राज्य युनिटचे अध्यक्ष अरुण साव यांनी लिहिले की, जया बच्चन यांनी थिएटर आणि लोकशाहीचे सर्वोच्च व्यासपीठ यातील फरक ओळखावा. तिकडे, भाजपचे दिल्लीचे प्रवक्ते अयाज सेहरावत यांनी लिहिले की, राज्यसभा खासदार जया बच्चन यांचे वर्तन लज्जास्पद आहे.
पापाराझींवरही राग काढतात
जया बच्चन संतापण्याची पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वी मिसेस बच्चन यांनी परवानगीशिवाय फोटो क्लिक केल्यामुळे पापाराझींवर संताप व्यक्त केला होता. जया बच्चन पती अमिताभ बच्चन यांच्यासह मध्य प्रदेशातील इंदूर विमानतळावर पोहोचल्याचे एका व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत होते. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने त्याच्या मोबाईलवरुन त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केले. हे पाहून जया म्हणाल्या, माझे फोटो काढू नकोस.