खासदार इंजिनिअर राशिद तिहार कारागृहात ट्रान्सजेंडर्समुळे त्रस्त; 'ते' HIV पॉझिटिव्ह असल्याचा AIP चा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 16:15 IST2025-09-05T16:14:21+5:302025-09-05T16:15:49+5:30
इंजिनिअर रशीदवर दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत केल्याचा आरोप आहे. एनआयएने त्याला बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायद्याअंतर्गत म्हणजेच यूएपीए अंतर्गत अटक केली आहे. तो 2019 पासून तुरुंगात आहे. त्याने २०२४ ची लोकसभा निवडणूक तुरुंगातूनच लढवली आणि जिंकलीही.

खासदार इंजिनिअर राशिद तिहार कारागृहात ट्रान्सजेंडर्समुळे त्रस्त; 'ते' HIV पॉझिटिव्ह असल्याचा AIP चा दावा
जम्मू-काश्मीरातील बारामुल्लाचे खासदार इंजिनिअर राशीद यांनी, तिहार तुरुंगात आपल्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा दावा केला आहे. त्यांनी त्यांचे वकील जावेद हुब्बी यांना यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, तिहार कारागृह प्रशासनाने कश्मीरी कैद्यांना त्रास देण्यासाठी नव्या पद्धती शोधून काढल्या आहेत. त्यांच्या बॅरेकमध्ये जाणूनबुजून ट्रन्सजेंडर मंडळींना ठेवण्यात आले आहे. त्यांना भडकावण्यासाठी, हल्ला करण्यासाठी आणि शत्रुतापूर्ण वातावरण बनवण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.
अवामी इतिहाद पार्टी (एआईपी)च्या निवेदनानुसार, हुब्बी यांनी कारागृहात राशिदची भेट घेतल्यानंतर, दावा केला आहे की, "ट्रान्सजेंडर्सच्या एका समुहाने त्यांना धक्का देत त्यांच्या अंगावर गेट पाडले. यातून ते कसे-बसे वाचले. हे घातक ठरू शकले असते. हे त्यांना घातक साबित हो सकता था. हा त्यांना हानी पोहोचवण्याच्या प्रयत्नापेक्षा कमी नाही."
"नमाजच्या वेळीही त्रास देतात" - इंजिनिअर राशीद -
याच बरोबर त्यांनी दावा केला की, "कश्मीरी कैदी जेव्हा नमाज पठन करायला सुरुवात करतात, तेव्हाही ट्रान्सजेंडर त्रास देतात आणि त्यांना भडकवण्याचा प्रयत्न करतात. महत्वाचे म्हणजे, या ट्रान्सजेंडर्सना एचआयव्ही पॉझिटिव्ह घोषित करण्यात आले आहे. तसेच त्यांना जाणून बुजून कश्मिरी कैद्यांसोबत ठेवण्यात आले आहे," असा दावाही त्यांनी केला आहे. इंजिनिअर रशीद यांच्या अवामी इत्तेहाद पक्षाने (एआयपी) संपूर्ण प्रकरणावर चिंता व्यक्त केली आहे आणि स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे.